

Dhule Mayor Mayadevi Pardeshi Hospitalized After Alleged Poisoning
esakal
धुळे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या बदनामीकारक पोस्ट आणि मानसिक त्रासाला कंटाळून धुळे महानगरपालिकेच्या भाजपच्या महिला महापौर मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सध्या महापौरांवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आमदारांनी दिली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा