भाजपचा डाव मोडण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संवाद सुरु : राऊत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 November 2019

मुंबई : भाजपचा राज्यात राष्ट्रपती राजवटीचा डाव आहे. त्यामुळे आम्ही राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी तयार आहोत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील एकही नेता सत्तेसाठी हापापलेला नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना आज (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला राज्यपालांना कळवावे लागणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राऊत म्हणाले, की आम्हाला जनतेचा अपमान केला म्हणणाऱ्यांचा काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्याशी काय लव्ह जिहाद होता? काँग्रेस, राष्ट्रवादी या मातीतले पक्ष आहेत ते काय पाकिस्तानचे नाहीत. हे महाराष्ट्र राज्य आमचे आहे. या राज्यात कुठ्लही आस्थिरता येता कामा नये. राष्ट्रपती राजवटीच्या नावाखाली कोणही सत्ता आपल्या ताब्यात ठेवू पाहत असेल तर त्याला तिन्ही पक्षाचा विरोध राहील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या हव्यासापोटी एकत्र आलेलो नाही. शरद पवार आणि काँग्रेस नेते या सर्वांची भूमिका आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. सगळ्याच नेत्यांचा एकमेकांशी प्रेमाने संवाद सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी कसोटीचा क्षण आहे. या दोन्ही पक्षांशी संवाद सुरु आहे.

शिवसेनेच्या आमदारांची सह्या घेण्यास सुरवात; जोरदार हालचाली

राज्यपालांनी आम्हाला कमी वेळ दिला आहे. तरीही आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो. शिक्षण, आरोग्य, शेती या आधारे सरकार निर्माण होत असेल तर सरकार बनविण्यास तयार आहेत, असे राऊत यांनी सांगितले.

भाजपची माघार; लक्ष शिवसेनेकडे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dialogue with NCP and Congress to give stable government to the state says Sanjay Raut