अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला आहे, सैफला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा हल्ला कोणी आणि कशासाठी केला याची अद्याप माहिती समोर आलेला नाही. पोलिसांनी हल्लेखाराला पकडण्यासाठी सात पथके नेमली आहेत. सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत अनेक तर्कवितर्तक लढविले जात आहेत. या हल्ल्याला 26 वर्षांपूर्वीची ती घटना तर कारणीभूत नाही ना? अशी चर्चा सुरु आहे.