
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्र्यातील निवासस्थानी गुरुवारी चोराने हल्ला केला. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला गेला. त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याच्यावर उपचार केले जात आहेत. मुंबई पोलीस आणि क्राइम ब्रँचकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.