Anand Dave: तुमच्या आज्जीने सावरकरांचे पत्र वाचलं नव्हतं का? आनंद दवेंचा राहुल गांधींना सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anand Dave

Anand Dave: तुमच्या आज्जीने सावरकरांचे पत्र वाचलं नव्हतं का? आनंद दवेंचा राहुल गांधींना सवाल

राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून राज्यात चांगलाच वाद पेटला आहे. वीर सावरकर हे इंग्रजांची पेंशन घेत होते. त्यांच्यासाठी काम करत होते, असं वक्तव्य आधी राहुल गांधी यांनी वाशिममध्ये केलं. त्यानंतर आता राज्यभरातून या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटल्या.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

राहुल गांधी यांच्या आजीने म्हणजेच इंदिरा गांधी यांनी सावरकरांना देणगी दिली होती. त्यांनी सावरकरांच्या कर्तृत्वाबद्दल बोलताना पत्रात धाडसी असा उल्लेख केला होता, तो काय कुणाच्या दबावाखाली केला होता का? राहुल गांधींनी त्यांच्या आजीने सावरकरांना लिहिलेलं हे पत्र वाचलं नाही का? असा प्रश्न हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी केला आहे.

हेही वाचा: Rahul Gandhi: 'तुमचा नोकर...सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र फडणवीसांनी वाचावं

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज राज्यभरातून उमटत आहेत.दरम्यान अशातच राहुल गांधी यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र माझ्याकडे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. भारत जोडो यात्रा आज अकोल्यात आहे. आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं आहे. इंग्रजीत असलेल्या या पत्रात, सर मै आपका नौकर रहना चाहता हूँ… असं लिहिल्याचंही राहुल गांधी यांनी सांगितलं.

हेही वाचा: Bharat Jodo Yatra : काँग्रेसचा ‘इव्हेंट’की स्थित्यंतराची सुरूवात?   

टॅग्स :Rahul GandhiVeer Savarkar