...हे तर राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण : गृहमंत्री वळसे पाटील

कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आम्ही तयार आहोत असं गृहमंत्री वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
Dilip Valse
Dilip ValseSakal

मुंबई : कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आम्ही तयार आहोत. जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कादेशीर कारवाई होणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांना बोलताना स्पष्ट केलं.

भोंग्याच्या प्रकरणावरुन सध्या महाराष्ट्रभर राजकारण तापलं असून प्रशासनाकडून शांततेच आवाहन केलं जात आहे. आम्ही राज्यातील पोलिस महासंचालकांना जिल्ह्यातील पोलिस आयुक्तांसोबत बैठका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. आणि महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची अशांतता होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं.

अमरावतीत सध्या सुरु असलेल्या तणावाबद्दल बोलताना ते म्हणाले, अमरावतीत काही घटक जास्त सक्रिय असल्याने तेथे तणाव निर्माण झाला आहे. त्या घटकांचा बंदोबस्त केला पाहिजे.

Dilip Valse
इस्त्राइलकडून Iron Beam लेझर तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; पाहा व्हिडीओ

मुख्यमंत्र्यासोबत सारखी बैठक होते आणि त्यामध्ये राज्यातील शांतता, सुव्यवस्था आणि कायद्यासंदर्भात चर्चा होत असते. राज ठाकरे यांना केंद्रीय सुरक्षा देण्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, हे तर राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे, राज्य सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षेसाठी सक्षम असून केंद्रीय सुरक्षेचा वापर कसा करायचा हे त्यांनी ठरवावं. असं ते म्हणाले.

Dilip Valse
आधी मुलाला अन् बायकोला मारले, मग लावला गळफास; कुटुंब उध्वस्त

आपल्या देशात वेगवेगळ्या कारणांवरून जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न होतोय, अशांतता निर्माण केली जात आहे आणि इतर प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोपही त्यांनी केला आहे.

भोंग्याच्या प्रकरणावर गृहमंत्री ऍक्शन घेत नाहीत असा सवाल लोकांकडून केला जात आहे यावर बोलताना ते म्हणाले की, मी कायद्यानुसार, नियमानुसार काम करतोय, मी माझ्या पद्धतीने ऍक्शन घेतो, त्यामुळे राजकारण करत असताना कोण काय बोलतो ते महत्त्वाचं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com