Phone Taping Probe | नाना पटोले, बच्चू कडूंचे फोन IPS अधिकाऱ्याने केले टॅप, गृहमंत्र्यांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dilip walse patil

नाना पटोले, बच्चू कडूंचे फोन IPS अधिकाऱ्याने केले टॅप, गृहमंत्र्यांची माहिती

नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅपिंग करून नेत्यांना अडचणीत आणल्याप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला पुणे शहर पोलिस आयुक्त असताना राजकीय लोकांचे फोन अनधिकृतपणे टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बच्चू कडू, आशिष देशमुख, नाना पटोले, संजय काकडे यांचे फोन रश्मी शुक्लांनी टॅप केल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले. (Dilip Walse Patil)

रश्मी शुक्ला दोषी आढळल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन टॅप करायचे असेल तर कायद्यानुसार सार्वजनिक सुरक्षा, दहशतवादी कृती, संवेदनशील घटना, परराष्ट्र संबंध या कारणासाठी फोन टॅप करता येतात. शुक्ला (rashmi shukla) यांनी परवानगी ज्यासाठी घेतली ते सोडून इतर फोन टॅप केले. शुक्ला यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख आणि संजय काकडे यांचे फोन टॅप केले होते, असेही गृहमंत्री (Dilip Walse Patil) म्हणाले.

हेही वाचा: 'लवासा' बेकायदा असल्याचा आरोप करणारी याचिका निकाली

फोन टॅप केल्यानंतर त्याचा राजकीय कारणासाठी उपयोग झाल्यानंतर हे बाहेर आले होते. याप्रकरणी नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशीत फोन टॅपिंग केल्याचे समोर आले. यामुळे राज्याचे पोलिस महासंचालकांना कारवाई करायच्या सूचना दिल्या होत्या. रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांनी कायद्याचा भंग केला आहे, असेही ते म्हणाले. बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे यांचे नाव अभिजित नायर, नाना पटोले यांचे अमजद खान व आशिष देशमुख यांचे नाव महेश साळुंके असे लिहून फोन टॅप केले होते, असेही दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले.

Web Title: Dilip Walse Patil Rashmi Shukla Phone Tap Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top