
सिलेक्टिव्ह कारवाया नाहीत, वळसे पाटलांचा राणा दाम्पत्यावरील कारवाईवर प्रतिक्रिया
मुंबई : माध्यमांनी लहान गोष्टींना किती महत्त्व द्यायचे हे ठरवायला हवे. महाराष्ट्र पोलिस परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. राजकीय पक्षांकडून सामंजस्याची अपेक्षा आहे. औद्योगिक, कृषी क्षेत्र अडचणीत आहे. बेरोजगारी, महागाईवर सर्व राजकीय पक्षांनी बसून चर्चा करायला हवे. कुठला तरी पक्षा सत्तेत असतो आणि विरोधात असतो. देशाला दिशा देण्याचे काम राज्य करतो. स्थानिक पोलिस अधिकारी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतात, अशी भूमिका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी राणा दाम्पत्य व राज ठाकरे यांच्यावरील कारवाई स्पष्ट केली. प्रत्येक ठिकाणी घटना घडलेली असते. तेथील स्थानिक पोलिस निर्णय घेतात. सिलेक्टीव्ह कारवाया झालेल्या नाहीत. परिस्थितीनुसार पोलिस निर्णय घेतात. (Dilip Walse Patil Say, Not Selective Actions On Rana Couple)
हेही वाचा: कल्याण-डोंबिवलीतील मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनात प्रवेश,एकनाथ शिंदे म्हणाले...
प्रत्येकाने वागताना, बोलताना कायद्याचे आदर करायला हवे. शेवटी मत व्यक्त करणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे. सकाळी उठून आरोप केले जातात. राणा दाम्पत्याने अमरावतीला घरीच चालीसा वाचायला हवे होते. प्रत्येकाने काळजी घेतली तर असे प्रसंग येणार नाहीत. महाराष्ट्रासमोर अनेक प्रसंग असताना भोंग्याचा प्रश्न काढणे, हुकुमशहाप्रमाणे अल्टिमेटम द्यायचे, पोलिसांचा गैरवापर होतो, असे आरोप केले जातात, असे वळसे पाटील म्हणाले. हे सर्व ठरवून गेले जात आहे. त्यातून महाराष्ट्राची छबी बिघडवण्याचे काम केले जात आहे.
हेही वाचा: राणा दाम्पत्यावरील गुन्हा अभ्यास करुनच; वळसे पाटलांचं स्पष्टीकरण
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष पूर्ण करेल. हा प्लॅन महाराष्ट्राची छबी बिघडवण्याचे.... भारतीय जनता पक्षाचे दहा प्रवक्त्यांकडून नाॅन इश्यू उपस्थित केले जातात. विरोधी पक्षाकडून आंदोलन केले जाते, त्यातून महाराष्ट्राचे चित्र बिघडवण्याचे काम केले जात आहे. गेले काही दिवस सातत्याने परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वातावरण सतत खराब कसे करता येईल, यासाठी प्रयत्न चालू आहे. प्रत्येकाने आपली वागणूक व्यवस्थित ठेवली पाहिजे,असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले.
Web Title: Dilip Walse Patil Say Not Selective Actions On Rana Couple
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..