
कल्याण-डोंबिवलीतील मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनात प्रवेश,एकनाथ शिंदे म्हणाले...
मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विकास कामे होत आहेत, असा दावा नगरविकास मंत्री तथा शिवसेना (Shiv Sena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. आज शुक्रवारी (ता.पाच) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी कल्याण-डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी मंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचे मी स्वागत करतो. या भागात मुलभूत सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केले जाईल. हे फोडाफोडीचे राजकारण नाही. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. (Eknath Shinde Say, Shiv Sena Do Development Works In Kalyan Dombivali)
हेही वाचा: Hingoli Crime| वसमतमध्ये महिलेवर तलवारीने वार, अकरा जणांवर गुन्हा दाखल
अनेक वर्षांपासून शिवसेना सत्तेत आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे या भागात कामे करत आहे. आम्ही फोडाफोडीचे राजकारण केलेले नाही. आपल्याला या भागातील लोकांना न्याय द्यायचे आहे. म्हणून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना दिले.
हेही वाचा: बहुसदस्यीय प्रभाग रचना योग्यच, याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
कल्याण-डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे मनसेला धक्का बसला आहे. पुढील काही काळात पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.
Web Title: Eknath Shinde Say Shiv Sena Do Development Works In Kalyan Dombivali
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..