Dilip Walse Patil: शरद पवारांवरील टीकेवर वळसे पाटलांचा यू-टर्न; स्पष्टीकरण देताना म्हणाले, 'मी खंत व्यक्त...'

राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilEsakal
Updated on

Dilip Walse Patil On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. 'शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत असं आपण म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा देशात एकही नेता नसल्याचं आपण म्हणतो. पण त्यांना राज्यात कधीच एकहाती सत्ता आणता आली नाही', अशी खोचक टीका दिलीप वळसे पाटील यांनी केली होती.

दिलीप वळसे पाटील यांच्या या टीकेवर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर इतरही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केला आहे. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

'मी खंत व्यक्त करत होतो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला', असं स्पष्टीकरण दिलीप वळसे पाटील यांनी दिलं आहे. वळसे पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर कार्यकर्त्यांमध्ये रोष दिसून येत होता. त्यानंतर आज त्यांनी या टीकेवर स्पष्टीकरण दिलं आहे.

Dilip Walse Patil
Maharashtra Politics: दानवेंच्या मुलाचा साखरपुडा शिरसाटांचा गोडवा, कट्टर विरोधकांच्या त्या फोटोमुळे भुवया उंचावल्या

'माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. माझं संपुर्ण भाषण ऐकलं तर मी पवार साहेबांबद्दल असं काही बोललो नाही. पवार साहेबांनी ४० ते ५० वर्ष आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी काम केलं आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातील अनेक प्रादेशिक पक्ष आपल्या हिमतीवर बहूमत मिळवून सत्तेवर बसतात. परंतु महाराष्ट्रातील जनतेने अशी शक्ति पवार साहेबांच्या सोबत उभी केली नाही, याची मला खंत आहे, आणि ती खंत मी व्यक्त करत होतो, असं वळसे पाटील म्हणाले आहेत.

तर ते पुढे म्हणाले की, 'पवार साहेबांना कमी लेखण्याचा किंवा पवार साहेबांना चुकीचं काही बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही', असंही ते म्हणालेत.

Dilip Walse Patil
Weather Update: प्रतीक्षा वाढली! राज्यात पावसाची पुन्हा हुलकावणी; सप्टेंबरमध्ये पावसाची आशा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ambegaon Super 23: Dilip Walse Patil Lauds Innovative Educational Initiative in Ghodegaon
Dilip Walse Patil and CM Devendra Fadnavis
Spiritual Grandeur: Former Minister Dilip Walse Patil Visits Religious Festivities in Ambegaon
Former Minister Dilip Walse Patil
Marathi News Esakal
www.esakal.com