Dinosaur In India : भारतातून डायनोसॉर अचानक नामशेष कसे झाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dinosaur In India

Dinosaur In India : भारतातून डायनोसॉर अचानक नामशेष कसे झाले?

Dinosaur In India : डायनोसॉर एकेकाळचा सर्वात महाकाय प्राणी. त्याची उत्पत्ती व त्याचे अचानक नामशेष होणे हे आजही सगळ्यांसाठी एक न उलगडलेले कोडे आहे. स्टीव्हन स्पिलबर्गच्या 'ज्युरासिक पार्क' या चित्रपटामुळे डायनोसॉर पहिल्यांदा रूपेरी पडद्यावर अवतरला व त्याची ओळख सर्व जगाला झाली. सुमारे सव्वासहा कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर या महाकाय प्राण्याची संपूर्ण प्रजाती या पृथ्वीवरून एकाएकी नाहिशी झाली.

हेही वाचा: Bissi Bele Bhath : रोजचं डाळ भात, खिचडी खाऊन बोर झालात? ट्राय कर साऊथ इंडियन स्टाईल बीसी बेले भात

आत्तापर्यंत त्यांच्या नाहिसे होण्याबद्दल संशोधक व शास्त्रज्ञांकडून वेगवेगळे अंदाज वर्तविले गेले आहेत. जलप्रलय, वातावरणबदल, तापमानबदल, भूकंप, ज्वालामुखीचे स्फोट, उल्कापात या नैसर्गिक आपत्तींच्या शक्यता डायनोसॉरच्या विनाशासाठी कारणीभूत ठरवल्या जात आहेत. मात्र, एका संशोधनानुसार भारतात झालेले ज्वालामुखीचे स्फोट व मेक्सिकोतील उल्कापात यांच्या एकत्रित परिणामामुळे हे डायनोसॉर नष्ट झाले, असे कारण पुढे येत आहे.

हेही वाचा: Trip To Kalasubai : न्यू इयर साठी दोन दिवसांच्या ट्रिपच प्लॅनिंग करत आहात? मग भेट द्या महाराष्ट्राच्या एव्हरेस्टला

अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अॅड्रिया डटॉन व त्यांचे सहकारी यांनी याबाबत संशोधन करून नवीन माहिती उजेडात आणली. आहे. या संशोधनाकरिता त्यांनी 'कार्बोनेट आयसोटोप पॅलिथरमोमिटर' हे नवीन विकसित झालेले उपकरण वापरले.

हेही वाचा: Anxiety : आर्टिफिशियल शुगरमुळे Anxietyचा वाढता धोका; अभ्यासातून समोर आली महत्त्वपूर्ण माहिती

या उपकरणाच्या साह्याने अंटार्क्टिका महासागरातील जीवाश्मांचे रासायनिक पृथ:क्करण करण्यात आले, तेव्हा अंटार्क्टिका महासागराचे तापमान चौदा अंशांनी वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. डटॉन यांच्या संशोधनानुसार या तापमानवाढीमागे भारतात झालेला ज्वालामुखीचा स्फोट व मेक्सिकोमध्ये झालेला उल्कापात हे दोन घटक आहेत.

हेही वाचा: Wedding Look Lipstick Shade : नाईट लुकसाठी असायलाच हव्या या लिपस्टिक शेडस! हिना खान कडून घ्या इंस्पिरेशन

ज्वालामुखीचा स्फोट, उल्कापात व अंटार्क्टिका महासागराचे वाढलेले तापमान यांच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीवर तापमानवाढ झाली व या बदलांशी अनुकूलन न साधता आल्याने डायनोसॉरची प्रजाती नष्ट झाली, असा निष्कर्ष डटॉन यांनी काढला आहे. भारतातले दख्खनचे बेसाल्ट पठार, पश्चिम घाटाचा पर्वतीय प्रदेश या सगळ्याची निर्मिती ज्वालामुखीचे थर एकावर एक पसरून झालेली आहे. भारतीय उपखंडात झालेल्या ज्वालामुखीचे स्फोटाचे ते पुरावे आहेत.