राज्य बॅंकेकडून शेतकऱ्यांना थेट कर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

सोलापूर - राज्यातील ३१ जिल्हा बॅंकांपैकी सोलापूर, नाशिक, बीड, नागपूर, बुलडाणा यासह १६ जिल्हा बॅंका सध्या कर्जमाफी खोळंबल्याने आणि थकबाकी वाढल्याने अडचणीत आल्या आहेत. शेतीसह बिगरशेतीला पुरेशा प्रमाणात कर्जवाटपास त्या असमर्थ ठरत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आता मोठ्या शेतकऱ्यांसह बिगरशेतीला राज्य बॅंक विकास सोसायट्यांच्या माध्यमातून थेट कर्ज दिले जाणार असून, कर्जवसुलीवर जिल्हा बॅंकेला एक टक्‍का कमिशन मिळणार आहे.

बुलडाणा व सोलापूर जिल्हा बॅंकांमध्ये हा प्रयोग राबविला जाईल. आगामी वर्षापासून तो अडचणीतील जिल्हा बॅंकांसाठी लागू होईल. त्यानुसार नाबार्ड व राज्य बॅंकेचे नियोजन सुरू आहे. जेणेकरून आर्थिक स्थिती नाजूक झालेल्या जिल्हा बॅंका सक्षम होतील. तत्पूर्वी मोठे कर्जदार जिल्हा बॅंकांपासून निसटले तर आगामी काळात सहकारी बॅंका अडचणीत येऊ नयेत, असे नियोजन केले आहे. त्यासाठी राज्य बॅंकेच्या आगाऊ शाखाही सुरू करण्यात येणार आहेत.

थांबलेली कर्जमाफी योजना, दुष्काळ, थकबाकी यासह अन्य कारणांमुळे सोलापूरसह अन्य जिल्हा बॅंका अडचणीत आल्या आहेत. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वेळेवर कर्ज देणे अशक्‍य झाले आहे. त्यासाठी नाबार्डच्या सहकार्यातून आता राज्य बॅंक विकास सोसायट्यांच्या माध्यमातून थेट कर्जवाटप करणार आहे. शेतकऱ्यांना आपल्याशा वाटणाऱ्या जिल्हा बॅंका सक्षम करण्याचे नियोजन या प्रयोगातून होणार आहे.
- किसन मोटे,  सरव्यवस्थापक, सोलापूर जिल्हा बॅंक

Web Title: Direct loan to farmers from State Bank