
Latest News : मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा निघाला. पोलिसांनी मनसे आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड करत आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला. पण यामुळे हे आंदोलन अधिक पेटलं. आता या मोर्चाला सुरुवात झाली असून दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजीत पानसे सहभागी झाले आहेत. त्यांनी सुरुवातीला झालेल्या अटक सत्रावर भाष्य केलं.