अपंगांची आरोग्य विमा योजना बारगळली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

मुंबई - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अपंगांसाठी सुरू झालेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना बारगळली आहे. केंद्र सरकारने विमा रकमेचा वाटा दिला नसल्याने, ही योजना अचानक बंद झाल्यामुळे अपंग हवालदिल झाले आहेत.

मुंबई - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अपंगांसाठी सुरू झालेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना बारगळली आहे. केंद्र सरकारने विमा रकमेचा वाटा दिला नसल्याने, ही योजना अचानक बंद झाल्यामुळे अपंग हवालदिल झाले आहेत.

अनेकांनी नियमानुसार पैसे भरूनही संबंधित कंपनीने विमा दिलेला नाही. त्यामुळे भरलेले पैसे तरी परत मिळावेत, यासाठी अपंगांच्या संघटनांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने २ ऑक्‍टोबर २०१५ पासून अपंगांसाठी स्वावलंबन आरोग्य विमा योजना राबविण्यात येत आहे. अंधत्व, क्षीण दृष्टी, बहिरेपणा, कमी ऐकू येणे, मानसिक आजार, कुष्ठरोग, असे अपंगत्व असलेल्या शून्य ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार होता. वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांच्या आत असलेल्या अपंगांना ३५५ रुपये भरून या योजनेचा लाभ घेता येईल, अशी अट आहे. विमा हप्त्यातील ९० टक्के वाटा केंद्र सरकारकडून उचलण्यात येणार आहे.

संबंधित खात्याशी वारंवार पत्रव्यवहार करूनही हे प्रकरण मंत्र्यांकडे प्रलंबित आहे, असे उत्तर सरकारकडून मिळत आहे. त्यामुळे केंद्रीय सामाजिक मंत्र्यांनी लक्ष घालावे; अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.
- प्रल्हाद चोरगे, प्रमुख संघटक, दिव्यांग क्रांती संघटना, मुंबई
 

Web Title: Disability Health Insurance Scheme Stops