
यवतमाळ : आषाढी एकादशी महिनाभरावर आली आहे. अवघ्या महाराष्ट्राला पांडूरंगाच्या भेटीची आस लागली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी जयहरी विठ्ठलाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. या वारीत गेल्यावर्षीपासून यवतमाळातून निघणाऱ्या दृष्टीहिनांच्या दिव्यांग वारीने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. यावर्षी ही दिव्यांग वारी रविवार, १५ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे.