
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांची मित्र पक्षांसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असून, आज रात्री जागा वाटपाची माहिती जाहीर केली जाईल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांची मित्र पक्षांसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असून, आज रात्री जागा वाटपाची माहिती जाहीर केली जाईल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच समाजवादी पक्ष तीन जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी यावेळी स्पष्ट केले. चव्हाण म्हणाले, "दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष व अन्य नेते जागा वाटपाबाबत चर्चा करीत आहेत. मित्रपक्षांनाही योग्य जागा देण्यात येतील. चर्चा अंतिम टप्प्यात आहे. ती पूर्ण झाल्यानंतर, जागावाटपाचा तपशील जाहीर करण्यात येईल.''
Vidhan Sabha 2019 : उमेदवारी न मिळाल्याने नाराज खडसे म्हणाले...
दरम्यान, काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष प्रत्येकी 125 जागा लढविणार असून, उर्वरीत 38 जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत.
Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील अडकणार मतदारसंघात, कारण...