Vidhan Sabha 2019 : उमेदवारी न मिळाल्याने नाराज खडसे म्हणाले...

वृत्तसंस्था
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

चाळीस वर्षे आपण प्रामाणिकपणे काम करून आपल्याला का असे वागवले गेले. माझा गुन्हा काय ते तरी सांगावे.

- एकनाथ खडसे, भाजप नेते.

जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. मात्र, राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली नाही. यावरून नाराज झालेल्या एकनाथ खडसे यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, चाळीस वर्षे आपण प्रामाणिकपणे काम करून आपल्याला का असे वागवले गेले. माझा गुन्हा काय ते तरी सांगावे.

एकनाथ खडसे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मुक्ताईनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत त्यांचे उमेदवार म्हणून नाव नव्हते. त्यामुळे नाराज झालेल्या खडसेंनी यावर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. एकनाथ खडसे म्हणाले, गेली चाळीस वर्षे आपण पक्षाशी एकनिष्ठ, प्रामाणिक राहिलो. इतर पक्षातून अनेकवेळा मंत्रिपदापासून विविध प्रलोभने, आश्वासनं मला मिळाली होती. मात्र, आपण पक्षाची बांधिलकी कधीही सोडली नाही. हे सगळं करून झाल्यानंतर बाहेरच्यांच्या आरोपांवरून कोणतीही चूक नसताना आपल्याला तीन वर्षांपासून मंत्रिपदावरून दूर केले गेले, अशा शब्दांत खडसे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. 

...म्हणून मुंडेंनी भगवानगड सोडून सावरगाव बनविले सत्तेचे केंद्र

'आकां'ना विचारणार

मागील 40 वर्षे आपण प्रामाणिकपणे काम केले. मात्र, मला पक्षातून अशी का वागणूक दिली गेली. याबाबत मी माझ्या 'आकां'ना विचारणार आहे. तसेच माझा गुन्हा काय ते तरी सांगावे, असेही खडसे म्हणाले.

Vidhan Sabha 2019 : राजापुरात आघाडीकडून कुणबी कार्डची खेळी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eknath khadse will ask to bjp senior leaders for his candidacy for vidhan sabha