तर 'राष्ट्रवादी'सोबत आघाडीची चर्चा - निरुपम

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 जानेवारी 2017

मुंबई - महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडीची कदापिही शक्‍यता नाही, असे वारंवार सांगणारे मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज एक पाऊल मागे घेत आघाडीची चर्चा शक्‍य असल्याचे सूतोवाच केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कमी जागांचा प्रस्ताव दिला तर ही चर्चा शक्‍य आहे, असे सांगत निरुपम यांनी आघाडीच्या बोलणीला शुक्रवारी सकारात्मक प्रतिसाद दिला.

मुंबई कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या वेळी मुंबईतल्या प्रत्येक प्रभागातील परिस्थिती व इच्छुक उमेदवारांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला कॉंग्रेस नेते गुरुदास कामत मात्र उपस्थित नव्हते. माजी खासदार मिलिंद देवरा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छा व्यक्‍त केल्याचे सूत्रांनी सांगितले. निरुपम यांना विचारले असता "आघाडी होऊ शकते. मात्र "राष्ट्रवादी'ने ताकदीनुसार जागांची मागणी करायला हवी. अकारण अवास्तव जागांवर दावा केल्यास चर्चा होऊ शकत नाही. "राष्ट्रवादी'ने कमी जागांची मागणी करावी, कॉंग्रेस चर्चेला तयार आहे,' असे त्यांनी सांगितले. मात्र किती जागा सोडण्याची कॉंग्रेसची तयारी आहे यावर ते काहीही बोलले नाहीत.

दरम्यान, आघाडी न होण्यामागे केवळ संजय निरुपम यांचा हटवादीपणा कारणीभूत असल्याचा दावा "राष्ट्रवादी'ने केला. तर कॉंग्रेसला विश्‍वासात न घेता पहिल्या 45 उमेदवारांची यादी "राष्ट्रवादी'ने जाहीर केल्याने आघाडीच्या चर्चेचा प्रश्‍नच नाही, असे कॉंग्रेस नेत्याचे मत आहे.

Web Title: discussion with ncp for aghadi