सोलापूर बाजार समितीत शेतकऱ्यांची विदारक स्थिती! ६० हजार पिशव्यांपैकी ५ पिशव्यालाच १६०० भाव

सोलापूर जिल्ह्यात ‘नाफेड’कडून कांदा खरेदी सुरु नसल्याने शेतकऱ्यांना ५५ हजार ९५७ पिशव्या कांदा ५ ते ५ रुपये किलोने विकावा लागला. केवळ पाच पिशव्यालाच सोळाशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. शनिवारी सोलापूर बाजार समितीत तब्बल ५१० गाड्या कांद्याची आवक आली होती.
onion farmer
onion farmersakal

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना कवडीमोल किंमतीत कांदा विकावा लागत आहे. सोलापूर जिल्ह्यात ‘नाफेड’कडून कांदा खरेदी सुरु नसल्याने शेतकऱ्यांना ५५ हजार ९५७ पिशव्या कांदा एक ते पाच रुपये किलोने विकावा लागला. केवळ पाच पिशव्यालाच सोळाशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. शनिवारी (ता. ४) सोलापूर बाजार समितीत तब्बल ५१० गाड्या कांद्याची आवक आली होती.

सोलापूर जिल्ह्यासह पुणे, लातूर, उस्मानाबाद, बीड, कर्नाटक येथून सोलापूर बाजार समितीत कांदा विक्रीसाठी येत आहे. जानेवारीअखेर सरासरी दर अडीच हजारांपर्यंत होता. फेब्रुवारीच्या पहिल्या १५ दिवसांत प्रतिक्विंटल सरासरी दर नऊशे रुपयांपर्यंत होता. पण, मागील २० दिवसांपासून सरासरी दर सहाशे रुपयांपर्यंत खाली आला आहे.

कांदा साठवण करून ठेवायला चाळ नाही, तो खर्च परवडत देखील नाही. त्यामुळे नुकसान होण्यापेक्षा मिळेल तेवढ्या दामात कांदा विकावा, या भावनेतून शेतकरी बाजार समितीत कांदा आणू लागला आहे. कांद्याला सरासरी दर सहाशे रुपयांचा जरी असला तरी, बहुतेक कांदा दोनशे ते पाचशे रुपये प्रतिक्विंटल दरानेच विकला जातोय ही वस्तुस्थिती आहे.

मजुरी, वाहनांचे भाडे वाढले असून खताच्या किमतीदेखील खूप जास्त आहेत. मशागतीपासून ते कांदा बाजार समितीत विक्रीसाठी आणेपर्यंत साधारणतः: सातशे रुपयांचा खर्च होतो. त्यामुळे न परवडणाऱ्या दरात शेतकरी अडचणींमुळे सध्या कांदा विकत असल्याची विदारक स्थिती सोलापूर बाजार समितीत पहायला मिळत आहे. आता राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३०० की ५०० रुपये अनुदान देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अतिवृष्टीतून सावरणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

राज्यातील २९ जिल्ह्यांना जुलै ते सप्टेंबर या काळात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. सततच्या पावसामुळे देखील शेतीचे नुकसान झाले होते. त्या धक्क्यातून सावरणाऱ्या बळीराजाने कांद्याला चांगला दर मिळेल म्हणून मुलांचे शिक्षण, मुलीच्या विवाहाचे स्वप्न पाहिले. चांगले पैसे होतील म्हणून बॅंकांनीही हेक्टरी ६५ हजारांचे कर्ज दिले. मात्र, दोन-चार रुपये किलो दराने कांदा विकला जात असल्याने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळत आहेत. ना बॅंकांचे कर्ज फेडायला पैसे नाहीत ना मशागतीचा खर्च निघाला, अशी शेतकऱ्यांची अवस्था पाहायला मिळत आहे.

बाजार समितीतील शनिवारची स्थिती

  • एकूण आवक

  • ५६० गाड्या

  • कांद्याचे सरासरी दर

  • १०० ते ६०० रुपये

  • शंभर रुपयाचा दर

  • ४१ पिशव्या

  • सरासरी सहाशेचा दर

  • ५५,९५७ पिशव्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com