खडसे-महाजन एकत्र आले तरी 'तो' तिढा कायम!

khadse-mahajan
khadse-mahajanesakal

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची ( Jalgaon District Bank Election Latest News ) रणधुमाळी सुरू झाली असून निवडणूक बिनविरोध होण्याबाबत एकनाथ खडसे (Eknath Khadase) व गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत (ता.27) रात्री उशिरा सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. परंतु यात ठोस निर्णय व एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे खडसे-महाजन एकत्र आले तरी 'तो' तिढा मात्र कायमच राहिला असं म्हणण्याची वेळ आली. वाचा सविस्तर....

तिढा कायम असला तरी लवकरच निर्णय

जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या समितीमधील सदस्यांची बैठक अजिंठा विश्रामगृह येथे झाली. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, एकनाथ खडसे, आमदार शिरीष चौधरी, सुरेश भोळे, किशोर पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील आदी उपस्थित होते. बैठकीनंतर सर्वपक्षीय पॅनलबाबत एकमत झाल्याचा दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला असून, काही जागांवर तीढा कायम असला तरी लवकरच याबाबत निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

khadse-mahajan
नाशिक : पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराचा महिलेवर बलात्कार

पुन्हा बैठक; 'या' जागांचा तीढा कायम

ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्वपक्षीय नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, 21 पैकी एक-दोन जागांबाबत एकमत होत नसल्याने सर्वपक्षीय पॅनलचे घोडे अडले आहे. सोमवारी रात्री सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेली कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात चर्चेची दुसरी फेरी पार पडली. पण ठोस निर्णय होऊ शकला नाही. आता जागा वाटपाच्या अंतिम निर्णयासाठी पुन्हा बैठक होणार असून, त्यात सर्वपक्षीय पॅनलचा तिढा सुटेल, अशी अपेक्षा आहे. काही जागांवर तीढा कायम असल्याची माहिती नेत्यांकडून देण्यात आली. भाजपने आठ जागांवर आपला दावा केला असून रावेर व चाळीसगाव साठी काँग्रेस ठाम असल्याने हा तीढा वाढला आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत चाळीसगाव, रावेर, यावल, एनटी राखीव व महिला राखीव या जागांबाबत एकमत होऊ शकले नसल्याचे समजते. पुन्हा जागांबाबत चर्चा होणार असून निवडणूक जाहीर होण्याच्या आगोदर सर्वपक्षीय उमेदवार निश्चित होणार आसल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. जिल्हा बँकेच्या हितासाठी आम्ही सर्व एकत्र आलो असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. बिनविरोध निवडीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

khadse-mahajan
नाशिक : तब्बल सहा नगरसेवकांवर गुन्हे दाखल

सव्वा वर्षाचा फॉर्म्युला

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. सर्वपक्षीय पॅनल बाबत समिती सदस्यांच्या आणखी काही बैठका होणार असून त्यातून सर्व जागांबाबत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com