सहकारी बॅंकांवर साखर सम्राटांचा डल्ला 

सिद्धेश्‍वर डुकरे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

मुंबई - जिल्हा सहकारी बॅंकांच्या पैशांवर साखर सम्राटांनी डल्ला मारल्याने पाच जिल्हा सहकारी बॅंकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अकरा सहकारी साखर कारखान्यांच्या संचालकांनी पाच सहकारी जिल्हा बॅंकांना 1400 कोटी रुपयांना बुडविले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्जे देताना बॅंकांनी हात वर केले आहेत. 

मुंबई - जिल्हा सहकारी बॅंकांच्या पैशांवर साखर सम्राटांनी डल्ला मारल्याने पाच जिल्हा सहकारी बॅंकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अकरा सहकारी साखर कारखान्यांच्या संचालकांनी पाच सहकारी जिल्हा बॅंकांना 1400 कोटी रुपयांना बुडविले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्जे देताना बॅंकांनी हात वर केले आहेत. 

सर्वपक्षीय साखर सम्राटांनी कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडविल्यामुळे राज्यातील अनेक जिल्हा सहकारी बॅंका प्रचंड आर्थिक संकटात सापडल्या आहेत. थकलेल्या कर्जाची वसुली झाली नसल्यामुळे साखर कारखान्यांच्या संचालकांना वेळोवेळी नोटीस बजावूनही काहीच फायदा होत नाही. कर्जबुडव्या साखर कारखान्यांविरोधात सहकार विभागाने आता कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी चालवली आहे. कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जातो. मात्र साखर कारखान्यांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवूनही कारवाईला विलंब होत असल्याचे दिसून आले आहे. 

थकबाकी असलेले नेत्यांचे कारखाने 
पद्मसिंह पाटील (तेरणा सहकारी साखर कारखाना), दिलीप सोपल (आर्यन शुगर कारखाना), विजयसिंह मोहिते पाटील (शंकर सहकारी साखर कारखाना), सुरेश देशमुख (सहकार महर्षी स्व. बापूरावजी देशमुख साखर कारखाना), राहुल बोन्द्रे (मुंगसाजी महाराज शुगर मिल आणि सहकारी सूतगिरणी) 

जिल्हा बॅंकेचे नाव : कारखाने व थकीत रकमा 
1. सोलापूर : आर्यन शुगर प्रा. लि. बार्शी (193 कोटी 49 लाख), शिवरत्न उदयोग प्रा. लि., अकलूज (159 कोटी, 45 लाख), सांगोला तालुका सहकारी कारखाना (81 कोटी 48 लाख), शंकर तालुका सहकारी कारखाना (52 कोटी 2 लाख) 
2. वर्धा : सहकार महर्षी बापूराव देशमुख कारखाना (67 कोटी 63 लाख), स्व. बापूरावजी देशमुख सहकारी सूतगिरणी (67 कोटी 63 लाख) 
3. नाशिक : निफाड सहकारी कारखाना (147 कोटी 48 लाख), नाशिक सहकारी साखर कारखाना (136 कोटी 92 लाख) 
4. बुलडाणा : मुंगसाजी महाराज सहकारी व अनुराधा शुगर मिल्स (41 कोटी 41 लाख) 
5. उस्मानाबाद : तेरणा सहकारी साखर कारखाना (284 कोटी), तुळजाभवानी सहकारी साखर (120 कोटी) 

Web Title: District cooperative bank money has been looted by the sugar emperor