अकरावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनो, अॅडमिशनसाठीचं वेळपत्रक झालंय जाहीर!

Students_11th_Admission
Students_11th_Admission

पुणे : विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने इयत्ता ११वीच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने प्रक्रिया सुरू करण्यासाठी बुधवारी (ता.१) वेळापत्रक जाहीर केले  आहे. गुरुवार (ता.२)पासून कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन नोंदणी संकेतस्थळावर करता येणार आहे, तर १५ जुलै पासून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. 

'कोरोना' मुळे इयत्ता १०वीचा निकाल उशीरा लागणार असल्याने यंदा केंद्रीय पद्धतीने ११वी प्रवेश करू नयेत, ऑफलाईन प्रवेशास मान्यता द्यावी अशी मागणी शिक्षण संस्थांनी लावून धरली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षण विभागाने ११वी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतची अधिक माहिती www.dydepune.com व इ .११वी ऑनलाईन प्रवेशाच्या https://pune.11thadmission.org.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

११ वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे:- 

- उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांची संकेतस्थळावर नोंदणी : २ जुलै ते १५ जुलै

- उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदविलेली माहिती तपासणी करून ऑनलाईन अंतिम करणे : २ जुलै ते १६ जुलै

- विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे, प्रवेश अर्ज भाग एक भरणे, मार्गदर्शन केंद्र निवडणे, अर्ज मंजूर झाला आहे याची खात्री करणे : १५ जुलै ते १० वीचा निकाल लागे पर्यंत

- विद्यार्थी अर्ज भाग १ तपासणी करून तो मंजूर करणे व आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्याशी संपर्क साधणे : १६ जुलै ते  १०वीचा निकाल लागे पर्यंत

- विद्यार्थ्यांनी भाग २ (पसंतीक्रम) भरणे व अर्ज सबमिट करणे (भाग १ सह) : १०वीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यापासून सुरू.

मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना 

- पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इ .११ वी चे सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होतील. या प्रक्रियेत सर्व मान्यता प्राप्त संस्था सहभागी होतील, याची दक्षता घ्यावी
-  इ .११ वी चे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने दिल्यास ते अमान्य ठरतील.
-  आरक्षणाबाबत एसईबीसी -१२ टक्के व दिव्यांग -०४ टक्के,  इसहाऊस कोटा -१० टक्के, व्यवस्थापन कोटा -०५ टक्के, अल्पसंख्यांक शाळांमध्ये कोटा -५० टक्के) याबाबत  जागृती करावी.
-   कोणत्याही कोट्यातुन प्रवेश हवा असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यास केंद्रीय ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. 
-  कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यानुषंगाने सर्व नियम पाळणे आवश्यक आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- शाळा/ महाविद्यालयांची नोंदणी सुरु झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करावी. कोणालाही प्रत्यक्षात बोलविण्याची गरज नाही. 
  - प्रवेश माहिती पुस्तिका छापील स्वरुपात दिली जाणार नाही. ऑनलाईन नोंदणी करताना विद्यार्थ्याना लॉगीन आयडी सह माहिती पुस्तिकेची साॅफ्टकाॅपी प्रत होईल. 
- प्रवेश शुल्क ऑनलाईन जमा करावे लागणार. 
- मुख्याध्यापक व तंत्र सहाय्यक यांचे प्रशिक्षण, पालक व विद्यार्थ्यासाठी उद्बोधन वर्ग घेण्यात येतील,
त्याचे वेळापत्रक वेळोवेळी जाहीर केले जाईल.
- प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेरी होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com