Diwali 2022: दिवाळाच्या दिवशीच शिंदे गटाच्या नेत्याने खाल्ली 'ठेचा-भाकरी'; म्हणाले शेतकऱ्यांना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Gaikwad

Diwali 2022: दिवाळाच्या दिवशीच शिंदे गटाच्या नेत्याने खाल्ली 'ठेचा-भाकरी'; म्हणाले शेतकऱ्यांना...

बुलढाणा : राज्यासह देशभरात दिवाळीचा उत्साह आहे, मात्र, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची 'दिवाळी कडू'च होणार असून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांसोबत ठेचा भाकरी घाऊन दिवाळी साजरी केली आहे.

(Diwali Celebration With Farmer and Thecha Bhakri)

"राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालंय, शेतकऱ्यांनी पिकवलं तरंच आम्ही खातो पण आज तो घरात उपाशी असेल आणि आपण मजा करत असू, गोडधोड खात असू हे मला मान्य नाही. मला शेतकऱ्यांबाबत आस्था, प्रेमभावना आहे, तर तो आज घरात चटणी भाकरी खात असेल तर आम्हीपण चटणी भाकरी खाणार असा निर्णय मी घेतला आहे म्हणून मी आज त्यांच्यासोबत ठेचा भाकरी खाऊन दिवाळी साजरी करत आहे" असं मत संजय गायकवाड यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा: Narendra Modi : "दिवाळी हा दहशतवाद्यांच्या अंताचा..."; मोदी म्हणाले...

या दिवळीत शेतकरी घरी उपाशी मरत असताना आम्ही कोणत्याही प्रकारची आतिषबाजी करणार नाही. ही कोणत्याही प्रकारची स्टंटबाजी नाही तर कुणाच्या विरोधातील आंदोलन नाही, फक्त शेतकऱ्यांच्या प्रती असलेल्या भावनेसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठेचा भाकरी खाऊन दिवाळी साजरी करत आहोत असं त्यांनी सांगितलं आहे.