Corona Virus : पोलिसांनो, मास्कची सक्ती नकोच!

do not force to wear mask Health department instruct  police
do not force to wear mask Health department instruct police
Updated on

पुणे : लॉकडाऊनच्या कामानिमित्त घराबाहेर पडण्याची परवानगी असणाऱया नागरिकांनाही पोलिस रस्त्यात अडवून मास्क घालण्याची सक्ती करत असल्याचे तक्रारी आल्या आहेत. मास्क कोणी घालावे या बद्दलचे स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी मास्क घालण्याची सक्ती करू नये,अशा स्पष्ट सूचना आरोग्य खात्याने दिल्या आहेत.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्याच्या अनेक भागात आपत्कालीन सेवेतील नागरिकांना रस्त्यात अडवून मास्क घालण्याची सक्ती पोलिसांनी केल्याच्या तक्रारी कॉलसेंटरला प्राप्त झाल्या आहेत. मास्क कोणी  वापरावे या बाबतचे स्पष्ट नियम घालून दिले आहेत. या शिवाय इतर सामान्य नागरिकांनी मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे मास्क घालण्याबाबत अशी सक्ती कोणीही करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
विनाकारण वैद्यकीय चाचण्या टाळा
परदेशातून प्रवास करून आलेल्या किंवा करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या यांनाच प्राधान्याने कोरोनाची चाचणी करण्याच सल्ला द्यावा. सर्दी खोकला असलेल्या रुग्णास विनाकारण करोना चाचणीचा आग्रह धरु नये,असेही आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. 

सरकारी तसेच खाजगी आरोग्य संस्था मधील बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग नेहमीप्रमाणे खुले असावेत. रुग्णालय स्तरावर फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी वेगळा बाह्य रुग्ण विभाग असावा. 
- Big Bazaar चा मोठा निर्णय; लॉकडाऊनमध्ये घरपोच मिळणार धान्य आणि भाज्या...

यांनीच फक्त मास्क वापरावा
-    परदेशातून आलेले लोक,
-    करोना बाधित रुग्ण, 
-    करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती
-     मेडिकल स्टाफ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com