Big Bazaar चा मोठा निर्णय; लॉकडाऊनमध्ये घरपोच मिळणार धान्य आणि भाज्या...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 March 2020

Big Bazaar नं आपल्या ग्राहकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. लोकांची गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून बिग बाजार आता लोकांना घरपोच सामान उपलब्ध करून देणार आहे

मुंबई: भारतात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. आतापर्यंत भारतात ६०० पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. दुर्दैवाने देशात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशाला संबोधित करत पुढील २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन राहणार असं सांगितलं. मात्र आता या लॉकडाऊनमध्येही बिग बाजारनं आपल्या ग्राहकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

२१ दिवस सर्व काही बंद राहणार असं कळल्यानंतर लोकांची आणि भाजीपाल्याच्या खरेदीसाठी एकच गर्दी मार्केटमध्ये आणि धान्याच्या दुकानांमध्ये बघायला मिळाली. भाजीपाला विक्रेते आणि किराणा दुकानांमध्ये लांबच लांब रांगा होत्या. मात्र गर्दी करून नका असं सांगण्यात आल्यानंतरही गर्दी होत असल्याने पोलिसांना नाईलाजाने सर्व दुकानं बंद करावी लागली.

मोठी बातमी - मुंबईत आणखी ९ तर ठाण्यात आढळला आणखी १ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

मात्र आता Big Bazaar नं आपल्या ग्राहकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. लोकांची गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून बिग बाजार आता लोकांना घरपोच सामान उपलब्ध करून देणार आहे. तसंच तुम्ही याचे पैसे तुमच्या घरीच देऊ शकणार आहात. त्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज पडणार नाहीये. तुम्ही घरीच राहून तुम्हाला हवं असलेलं सामान ऑर्डर करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला तुमच्या  घराजवळच्या बिग बाजारला फोन करा आणि त्यांच्याकडून सामान मागवून घ्या. सुविधा सध्या मुंबईच्या काही भागांमध्ये सुरु करण्यात येणार आहे.

कुठे कुठे असणार आहे ही सुविधा:

 • ठाणे
 • कल्याण
 • विलेपार्ले
 • विरार
 • कांदिवली
 • भाईंदर
 • दहिसर
 • वाशी
 • पनवेल
 • गोरेगाव
 • माटुंगा
 • मुलुंड
 • मालाड

मोठी बातमी - सुट्टीवर गेलेल्या सर्व पोलिसांना कामावर हजर राहण्याचे आदेश 

त्यामुळे या ठिकाणच्या बिग बाजारमध्ये ही सुविधा सध्या उपलब्ध असणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लोकांना दिलासा मिळणार आहे.

big bazaar starts home delivery of essentials goods during corona lockdown period 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big bazaar starts home delivery of essentials goods during corona lockdown period