बुलेट ट्रेन, एक्‍स्प्रेस वेसाठी जमिनी देऊ नका : राज ठाकरे

संदिप पंडित
मंगळवार, 1 मे 2018

बुलेट ट्रेन, एक्‍स्प्रेस वेला जमिनी दे  नका : राज ठाकरे 

वसई : बुलेट ट्रेन आणि मुंबई-बडोदा एक्‍स्प्रेस वेसाठी आपल्या जमिनी देऊ नका, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 1) वसई येथे केले. 

सरकारने जमिनींसाठी जबरदस्ती केली, तर मनसे स्टाईलने विरोध करा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

राज यांनी राज्याच्या दौऱ्याला मंगळवारपासून सुरुवात केली. वसई येथे राज यांची पहिली जाहीर सभा झाली. यात त्यांनी सत्ताधारी भाजपसह मोदींवर जोरदार टीका केली. 

गुजरातला मुंबई मिळाली नसल्याने महाराष्ट्रपासून मुंबई वेगळी करण्याचा डाव भाजप सातत्याने करीत आहे. बुलेट ट्रेन आणि मुंबई-बडोदा एक्‍स्प्रेस हा त्याचा भाग आहे. महाराष्ट्राची अवस्था फार बिकट झाली आहे. भाजप सरकार खोटारडे आहे. माझ्या हातात सत्ता द्या; मग पाहा कसा कायापालट करतो, असेही या वेळी राज म्हणाले. 

राज यांनी वसईत येणाऱ्या परप्रांतीय लोंढ्याचाही खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, की उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेल्यांनी महाराष्ट्रात सरकारच्या जमिनींवर ताबा मिळवला आणि हजारो चाळी बांधल्या. मनसेने आवाज उठवल्याने कारवाई झाली. आपण माझी जात श्रेष्ठ की त्याची या भांडणात अडकलो आहोत. बाहेरच्या राज्यातील लोक मात्र आपला फायदा घेऊन निघून जात आहेत. सरकारने अनेक मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना नक्की काय हवे? राज्यातील 42 टक्के जमिनीचे वाळवंट होत आहे. राज्यात तीव्र टंचाई असताना सरकार हजारो विहिरी खोदल्याचा दावा करत आहे. भाजप नागरिकांची फसवणूक करीत आहे.  

Web Title: Do not give your land for bullet train, appeals Raj Thackray