शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कमेला हात लाऊ नका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

मुंबई - शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात म्हणजेच थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) मार्फत वर्ग करण्यात येतो. यामध्ये काही बॅंका या शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होणाऱ्या रकमेतील पैसे कर्ज खात्यात परस्पर वळती करतात, अशा तक्रारी येत आहेत. त्यामुळे बॅंकांनी शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कम परस्पर वळती केल्यास कारवाईचा आदेश सहकार विभागाने काढला आहे.

सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना सुरू केली आहे. पीकविमा योजनेसह अन्य योजनांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होत असते. या वेळी जमा झालेला निधी कर्ज खात्यात वळता केल्याच्या हजारो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बॅंकांनी शेतकऱ्यांच्या लाभाची रक्कम परस्पर वळती केल्याचे आढळल्यास शेतकऱ्यांनी उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.

Web Title: Do not touch the amount of farmer's account