डॉक्‍टर तरुणीची ठाण्यात आत्महत्या

वृत्तसंस्था
रविवार, 6 जानेवारी 2019

ठाण्यातील कोलशेत येथील एव्हरेस्ट वर्ल्ड या उच्चभ्रू गृहसंकुलातील डॉक्‍टर तरुणीने इमारतीच्या 12 व्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीतून शनिवारी सकाळी सातच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली.
 

ठाणे- ठाण्यातील कोलशेत येथील एव्हरेस्ट वर्ल्ड या उच्चभ्रू गृहसंकुलातील डॉक्‍टर तरुणीने इमारतीच्या 12 व्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीतून शनिवारी सकाळी सातच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली.

नीट परीक्षेच्या ताणातून आत्महत्या केल्याचे तिने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झाले. तिची आई ठाण्यातील प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ आहे. एमबीबीएस झालेली शर्मिष्ठा सुफल सोम (वय 27) काही दिवसांपासून तणावात होती. नीट परीक्षेत वारंवार अपयश येत असल्याने हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. बाल्कनीतून उडी मारण्यापूर्वी तिने डाव्या हाताची आणि मानेची नस कापून घेतली. कापूरबावडी पोलिसांत या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

शर्मिष्ठाने तळेगाव येथील विद्यालयातून 2016 मध्ये एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर "एमडी'च्या शिक्षणासाठी तिने 2017 मध्ये पहिल्यांदा "नीट'ची परीक्षा दिली; मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने तिने पुन्हा नीटच्या परीक्षेची तयारी करीत होती. अभ्यास न झाल्याने ती तणावात होती. 

Web Title: Doctor Suicide In Thane