
सोलापूर : जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना श्री गणेशाची मुर्ती स्थापना करण्यापूर्वी पोलिस ठाण्यांकडून रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. यंदाच्या उत्सवासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून परवाना घ्यावा, असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.
यंदाचा गणेशोत्सव १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. शांततेत व आनंदात सर्वांनी हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात मूर्तीची सुरक्षा व देखभालीची मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. समोरील बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज केल्यावर त्याची प्रिंट काढून पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. पोलिस ठाण्याकडून रीतसर परवानगी मंजूर झाल्यावर परवानगी मिळणार आहे. परवाना मंजूर झाल्यावर पोलिस ठाण्याचा त्यावर सही- शिक्का व सूचना पत्र असेल. त्याशिवाय परवाना ग्राह्य मानला जाणार नाही, याची सर्व गणेशोत्सव मंडळांनी नोंद घ्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
असा करा अर्ज, मिळेल परवानगी
- citizen portal वरील Maharashtra Police- services for citizen वर क्लिक करा
- मुखपृष्ठावर गणेश फेस्टिवल परमिशन ॲप्लिकेशन क्लिक केल्यावर नवीन पेज उघडेल
- त्या पेजवर अध्यक्ष किंवा सदस्यांची नावे login- id बनवून ‘ओटीपी’ टाकून रजिस्ट्रेशन करावे.
- अकाऊंट तयार झाल्यावर login करा व त्यावेळी भाषा (मराठी, इंग्रजी) निवडा.
- ciitizen service निवडून गणेशोत्सव परवानगी निवडा. त्यानंतर फार्म उघडेल
- त्या फॉर्मवर मंडळाचा अध्यक्ष व किमान पाच ते दहा सदस्यांची पूर्ण नावे मोबाईल क्रमांकासह भरावीत
- गणेशोत्सव स्थापना तारीख व वेळ आणि मिरवणूक असल्यास तारीख व वेळ नमूद करावी.
- विसर्जन मिरवणूक असल्यास ‘होय’ नमूद करून तारीख व वेळ त्यात टाकावी लागणार आहे
मंडप अन् मुर्ती, देखाव्याचीही द्या माहिती
- मंडप मालकाची संपूर्ण माहिती भरावी
- मंडप कोणत्या ठिकाणी घालायचा आहे, त्या जागेची माहिती (गल्ली, नगर) द्यावी
- मंडपाची लांबी- रुंदी व गणेशमूर्तीची उंची, याचीही माहिती भरावी
- गणेशोत्सवात देखावा साकारणार असल्यास त्याची माहिती द्यावी
परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे...
- मंडळ किंवा संस्था रजिस्ट्रेशन केलेले धर्मादाय आयुक्तांचे नोंदणीपत्र
- गेल्यावर्षी पोलिस ठाण्याकडून परवानगी घेतलेल्या परवानगीची प्रत
- सार्वजनिक जागेत गणेशमूर्ती स्थापना करीत असल्यास ग्रामपंचायत व नगरपरिषद नाहरकत दाखला व खासगी जागेत असल्यास जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र
- तात्पुरत्या स्वरूपात विजेचे कनेक्शन घेत असल्यास वीज कनेक्शन पावती
- शेवटी भरलेल्या माहितीची खात्री करून फार्म सबमिट करावा
एक गाव एक गणपतीसाठी पुढाकार हवा
गणेशोत्सवासाठी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांकडून ऑनलाइन परवाना घ्यावा. गावातील तरूणांनी एकत्र येवून ‘एक गाव एक गणपती’साठी पुढाकार घ्यावा. शांततेत, आनंदात सर्वांनी गणेशोत्सव साजरा करावा.
- शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
शहरातील मंडळांना पोलिस ठाण्यातून मिळेल परवाना
शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना संबंधित पोलिस ठाण्यातून ऑफलाइन परवाना दिला जाणार आहे. सर्वांनी सर्व नियम व अटींचे पालन करून आनंदात उत्सव साजरा करावा. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरांसह विविध सामाजिक उपक्रमांवर मंडळांनी भर द्यावा.
- विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.