लगे रहो लेकिन मलिक और राऊत मत बनना! मोहित कंबोजचा थेट इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohit kamboj

लगे रहो लेकिन मलिक और राऊत मत बनना! मोहित कंबोजचा थेट इशारा

मुंबई : राज्यात सत्तातर झाल्यानंतर शिवसेना खिळखिळी झाली असून भाजपकडून शिवसेनेला पुन्हा लक्ष्य केलं जात आहे. दरम्यान सेनेच्या संजय राऊतांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात 31 जुलैला रात्री उशिरा ईडीकडून अटक झाली. त्यावरून भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये या नेत्यांची जागा भरण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याचं म्हटलं आहे.

(BJP Mohit Kamboj On NCP And Shivsena)

"राष्ट्रवादीमध्ये एक बोलबच्चन होता त्याचं नाव मियाँ नवाब मलिक (सलीम) आणि शिवसेनेत संजय राऊत (जावेद). असं वाटतंय की त्यांची जागा भरण्यासाठी आता पक्षात स्पर्धा सुरू आहे. स्पर्धा चालू ठेवा पण मलिक आणि राऊत बनू नका." असा धमकीवजा सल्ला भाजपच्या मोहित कंबोज यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांचा रोख कोणत्या नेत्यावर आहे हे पहावं लागणार आहे.

हेही वाचा: Khaby Lame : प्रसिद्ध टिकटॉकर खॅबीला अखेर मिळाले इटालियन नागरिकत्व

हेही वाचा: सेनेतील दोन आमदार शिंदे गटाच्या गळाला? मंत्री भुमरेंचा दावा

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडलं. शिंदे फडणवीस सरकार स्थापन होण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर सेनेचे अनेक नेते शिंदे गटात दाखल झाले. तर ज्या नेत्यांच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा होता अशा नेत्यांच्या चौकशीला शिंदे गटात गेल्यावर काहीसा ब्रेक लागल्याचं चित्र आहे. या नेत्यांमध्ये आनंदराव अडसूळ, अर्जुल खोतकर, भावना गवळी, यामिनी जाधव अशा अनेक नेत्यांचा सामावेश आहे.

शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना याआधीच भूखंड घोटाळ्याप्रकरणी अटक झालेली आहे. त्यानंतर, या नेत्यांची जागा घेण्यासाठी पक्षात स्पर्धा सुरू आहे, लगे रहो पण राऊत आणि मलिक बनू नका असा इशारा कंबोज यांनी ट्वीट करत दिला आहे.

Web Title: Dont Be Sanjay Raut Nawab Malik Bjp Mohit Kamboj Ncp Shivsena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..