esakal | देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाची जाहीरातबाजी नको, भाजपाकडून आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाची जाहीरातबाजी नको, भाजपाकडून आवाहन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते, कार्यकर्ते होर्डिंग, (hoarding) बॅनर (banner) लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून/ टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करु नये, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे (bjp) करण्यात आल्याचे भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी सांगितलं आहे. (Dont do advertisement of devendra fadnavis birthday bjp appeal to it workers dmp82)

होर्डिंग, बॅनर, जाहिराती कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत असे सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी सांगितलं.

हेही वाचा: उल्हासनगर: ४ वर्षांचा रूद्र लघुशंकेला गेला अन् पावसाने घात केला

भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा पक्षातर्फे करण्यात येत आहे. मागच्या महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा पक्ष कार्यकर्त्यांना असेच आवाहन केले होते.

loading image