Government School : सरकारी शाळा खासगी कंपन्यांकडे सोपवू नका; ‘रिपाइं’(आय)ची मागणी

राज्य सरकारने राज्यातील सुमारे ६२ हजार सरकारी शाळा या खासगी कंपन्यांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
RPI satish gaikwad
RPI satish gaikwadsakal

पुणे - राज्यातील सरकारी शाळा खासगी कंपन्यांकडे हस्तांतरित करू नयेत, आतापर्यंत अशा कंपन्यांकडे हस्तांतरित केलेल्या शाळांचे हस्तांतरण रद्द करावे, या हस्तांतरणाबाबतचा अध्यादेश त्वरित रद्द करावा आणि कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याबाबतचा निर्णय तत्काळ रद्द आदी विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आय) च्यावतीने शनिवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. रिपाइं (आय) चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात भारतीय दलित कोब्रा या संघटनेचे नेते भाई विवेक चव्हाण, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, वसंत साळवे, मारुती भापकर, कविता गाडगे, महानंदा डाळिंबे, शकुंतला शेलार, सुनीता अडसूळ, सागर वानखेडे, पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष सागर सपकाळ आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पालक या सहभागी झाले होते.

राज्य सरकारने राज्यातील सुमारे ६२ हजार सरकारी शाळा या खासगी कंपन्यांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवाय यापुढे सरकारी शाळांवर कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करण्याचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र भारतीय राज्य घटनेतील कलम ४५ अनुसार १४ वर्षांच्या आतील सर्व मुला-मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे, त्यासाठी आवश्‍यक सुविधा पुरविणे हे केंद्र आणि राज्य सरकारवर बंधनकारक आहे.

याशिवाय बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार मोफत शिक्षण मिळणे, हा १४ वर्षांच्या आतील सर्व बालकांचा मूलभूत हक्क व अधिकार आहे. त्यामुळे राज्य सरकारने सरकारी शाळांच्या हस्तांतराबाबत आणि कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करणे हे दोन्ही निर्णय त्वरित रद्द करावे, अशी मागणी यावेळी बोलताना करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com