निवडणुकांसाठी खोटं बोलू नका; उद्धव ठाकरेंच्या शहांना कानपिचक्या

येत्या काळात गरज पडली तर मी कोरोनाच्या परिस्थितीवर बोलेन असे ते म्हणाले.
Amit-Shah-and-Uddhav-Thackeray
Amit-Shah-and-Uddhav-Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांनी अमित (Amit Shah) शहांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या असे अनेक नेते आहेत जे निवडणुकीच्या वेळी सर्वसामान्यांना अनेक आश्वासने देतात आणि नंतर दिलेली ही आश्वासने विसरतात. मात्र, केवळ निवडणुका जिंकण्यासाठी खोटे बोलू नका असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना मारला आहे. निवडणुकांच्या (Election) काळात दिलेल्या आश्वासनांबाबत (Promises) ज्यावेळी मतदार (Voter) विचारतात तेव्हा हेच नेते निवडणुकीच्या वेळी अशा गोष्टी बोलल्या जातात असे वक्तव्य करतात, असे देखील यावेळी ते म्हणाले. (Chief Minister Uddhav Thackeray statement On Amit Shah)

Amit-Shah-and-Uddhav-Thackeray
सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, निर्बंध वाढणार : राजेश टोपे

ते म्हणाले की, शिवसेना (Shivsena) प्रमुखांनी आम्हाला खोटे न बोलण्याचे आणि जेवढे होईल तेवढेच आश्वासनं देण्याची शिकवण दिली आहे. तसेच केवळ निवडणुका (Election) जिंकण्यासाठी खोटे बोलू नका हीच शिकवण आमची असून याच वारसाचे अनुकरण शिवसेना करत असल्याचे ते म्हणाले. तुम्ही दिलेली आश्वासने पाळली नाहीत, तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत असे देखील ते म्हणाले. (Assembly Election 2022)

Amit-Shah-and-Uddhav-Thackeray
''भाजपच्या रॅलीत सरकारी कर्मचारी अन् तिकीट मागणाऱ्यांची गर्दी''

महाराष्ट्रातील कोरोनाच्या (Corona in Maharashtra) परिस्थितीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, येत्या काळात गरज पडली तर मी कोरोनाच्या परिस्थितीवर बोलेन. मात्र काळजी करू नका आम्ही परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहोत. फक्त तुमचा पाठिंबा आमच्या सोबत ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले. दरम्यान, कोरोनाचा वेग पाहता जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात दोन लाख सक्रिय रुग्ण आढळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यात ओमिक्रॉनचे 454 रुग्ण आढळून आले आहेत. (Corona Third Wave In India)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com