esakal | अभ्यासक्रम पूर्ण करण्याची घाई नको; विद्यार्थ्यांची हवा सुसंवाद
sakal

बोलून बातमी शोधा

varsha gaikwad

अभ्यासक्रम पूर्ण करण्याची घाई नको; विद्यार्थ्यांची हवा सुसंवाद

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे : शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची घाई करू नये. गेल्या दीड वर्षापासून घरातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्या मानसिक पुनर्वसनावर भर द्यावा, असा सल्ला शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी दिला आहे.

शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत मार्गदर्शन सत्राचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम. डी. सिंह, कोविड टास्क फोर्स सदस्य डॉ. समीर दलवाई, माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे, शिक्षण हक्क मंचाच्या हेमांगी जोशी, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती कार्याध्यक्ष पोपटराव पवार सहभागी झाले होते.

हेही वाचा: कंगना राणावत CM योगींच्या भेटीला! राजकारण की मनोरंजन? चर्चांना उधाण

डॉ. दलवाई म्हणाले,‘‘विद्यार्थ्यांनी गेल्या दीड वर्षांपासून घरातील वातावरणात राहून शिक्षण घेतले आहे. परिणामी मुलांना शाळा सुरू असतानाच्या दिनक्रमाचा विसर पडला आहे. त्यामुळे पालकांनी पूर्वतयारी करायला हवी. शिक्षकांनी तुर्तास अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या मागे न लागता सुरवातीचे काही दिवस विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणे संवाद साधायला हवा.’’ याला दुजोरा देत डॉ. काळपांडे म्हणाले,‘‘शाळा सुरू झाल्यावर सुरवातीला मुलांना आनंद वाटेल असे उपक्रम घ्यावेत. राज्य सरकारने पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याबाबतही सकारात्मक विचार करावा. तसेच शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम तातडीने करायला हवे.’’

‘‘सुरक्षित वातावरणात शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी काटेकोर पालन करायला हवे, त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे, तसेच शाळा सुरक्षितपणे सुरू ठेवण्यासाठी त्यांचा सहयोगही हवा आहे. शाळा आरोग्य विभागाशी जोडण्यात येत आहेत. त्याशिवाय शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांचे स्वागत करून शिक्षणाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.’’

- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री

loading image
go to top