मराठा आरक्षणाचे राजकारण नको - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

शिवसेनेला हिंदुत्वापासून तोडण्याचा काँग्रेसचा डाव
शिवसेनेमुळे मुंबईत मराठी माणूस आणि हिंदू टिकले. मात्र, काँग्रेसचा शिवसेनेला हिंदुत्वापासून तोडण्याचा डाव आहे. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओळखावे, असा सल्ला देत पाटील यांनी हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या झेंड्याचा रंग बदलण्यामागे काँग्रेस असल्याचेही त्यांनी सांगितले. कोथरूड मतदारसंघातील विकासकामांबाबत त्यांनी आयुक्त शेखर गायकवाड यांची बुधवारी भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुणे - ‘मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने येत्या १७ मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीत बाजू भक्कमपणे मांडावी,’’ अशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, आरक्षणाबाबत राजकारण करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबत राज्य सरकारने आपली बाजू मांडावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यावर १७ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘न्यायालयाचा आदेश हा मराठा समाजाला न्याय देणारा आहे. आधीच्या राज्य सरकारने बाजू भक्कम मांडली होती. त्यासाठी ताकदीचे वकीलही नेमले होते.’’

'एनआरसी' हिंदूंच्याही मुळावर येणारा, महाराष्ट्रात लागू करणार नाही : उद्धव ठाकरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont want the politics of Maratha reservation chandrakant patil