पाकिस्तानच्या हेतूविषयीच शंका - उज्ज्वल निकम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

बारामती - कुलभूषण जाधव यांचा वैद्यकीय अहवाल, कबुलीजबाब व न्यायालयीन प्रक्रियेची कागदपत्रे द्यावीत, या  भारताच्या मागणीची पाकिस्तान अवहेलना करत असल्याने पाकिस्तानच्या हेतूविषयीच शंका असल्याचे मत विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

ॲड. निकम रविवारी बारामतीत एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्या वेळी ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, ‘‘कुलभूषण जाधव यांचा पाकिस्तानने भयानक शारीरिक व मानसिक छळ करून, जबरदस्तीने कबुलीजबाब नोंदवून घेतला असावा, म्हणूनच पाकिस्तान त्यांचा वैद्यकीय अहवाल देत नाही व त्यांना भेटूही देत नाही. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजिज यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती लवकरच उठवू, अशी वल्गना करत भारतीय माध्यमांवर आगपाखड केली असली तरी या निकालाचा पाकने धसका घेतला आहे. त्यामुळेच त्यांनी कायदे सल्लगारांची नवीन टीम उतरविण्याची तयारी सुरू केली आहे.’’ पाकिस्तानला या निकालाचा अर्थ नीट समजला असून, ते वेड पांघरल्याचे नाटक करत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Web Title: The doubt about Pakistan's intentions - Nikam