डॉ. भूषण श्रीखंडे पदव्युत्तर ‘नीट’मध्ये राज्यात पहिला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

नागपूर - शहरातील भूषण श्रीखंडेने पदव्युत्तर नीट परीक्षेत बाजी मारत राज्यातून पहिला येण्याचा मान पटकावला. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या पदव्युत्तर ‘नीट’ परीक्षेत भूषणने ९०२ गुणांसह ९९.९९ टक्‍क्‍यांनी देशातूनही चौथा येण्याचा लौकिक मिळविला. पहिल्याच प्रयत्नात त्याने ही नेत्रदीपक कामगिरी केली. 

भूषण उत्तम तबलावादक असून, तबला विशारद आहे. अभ्यासातही त्याने म्युझिक थेरपीचा अवलंब करीत अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. त्यामुळेच हे यश मिळविता आल्याचे त्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले. यापूर्वी रॉयल कॉलेज लंडन येथील एमआरसीओसी भाग-१ ही परीक्षा त्याने उत्तीर्ण केली. याशिवाय एमबीबीएसचे अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना विदर्भ व राज्यस्तरीय प्रश्‍नमंजूषेत विजय मिळविला. अभ्यासासोबत खेळामध्येही आवड असल्याचे यावेळी भूषणने सांगितले.

तो विदर्भस्तरीय वैद्यकीय महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचाही चॅम्पियन ठरला होता. संशोधनाची आवड असलेल्या भूषणचे एमबीबीएसदरम्यान संशोधन पेपरही प्रकाशित झालेले आहेत. 

आता पुढे देशातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक असलेल्या नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्त्रीरोग विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणार असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. भूषणने यशाचे श्रेय वडील युरोलॉजिस्ट डॉ. अनिल श्रीखंडे व आई स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांच्यासह प्राध्यापकांना दिले.

Web Title: Dr. Bhushan Shrikhande First in NEET Exam