सीबीआय, एसआयटीने एकत्र तपास करावा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

मुंबई - ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि राज्याच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) एकत्रितपणे, गांभीर्याने आणि जलद गतीने करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. 

दाभोलकर आणि पानसरे यांच्या निकटवर्तीयांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्या. एस. सी. धर्माधिकारी यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास "सीबीआय'कडे, तर पानसरे यांच्या हत्येचा तपास "एसआयटी'कडे आहे. दोन्ही तपास यंत्रणांनी न्यायालयात सीलबंद अहवाल दाखल केला आहे. तपासाबाबतची माहिती प्रसिद्धिमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असल्याबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. दोन्ही प्रकरणांतील आरोपी सारखेच आणि एकाच कट्टरतावादी संघटनेचे असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी एकत्रित आणि समन्वयाने तपास करावा, अशी सूचना न्यायालयाने केली. 

एकत्रित तपास करताना आरोपींना अटक करण्याची योजना आखा आणि त्यातून ठोस निष्कर्ष काढा, असेही न्यायालयाने सुचवले आहे. तपास अहवालाबाबत न्यायालयाने समाधान व्यक्त केले आहे. कोणत्याही लहानसहान त्रुटी सोडू नयेत, तसे झाल्यास त्याचा फायदा आरोपींना होऊ शकतो, असा इशाराही न्यायालयाने दिला. याचिकेवर आता 20 मार्चला सुनावणी आहे. 

Web Title: DR. Dabholkar and Govind Pansare case