डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपींना जामिन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या अमोल काळे, राजेश बंगेरा व अमित देगावकर या तिघांना न्यायालयाने आज (शुक्रवार) जामिन मंजूर केला. मात्र, हे तीनही आरोपी पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणात अटकेत असल्याने त्यांना जामीन मिळूनही तुरुंगात राहावे, लागण्याची शक्यता आहे.

अंधश्रद्ध निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट, 2013 मध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येच्या काही महिन्यांनंतर आरोपींना पकडण्यात सीबीआयला यश आले. सीबीआयने अमोल काळे, राजेश बंगेरा व अमित देगावकर या तिघांना अटक केली. मात्र, 
सीबीआयने तीन आरोपी अटक केल्यानंतर 90 दिवसांमध्ये न्यायालयात त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक होते. मात्र, त्यानंतरही दोषारोपपत्र दाखल झाले नाही. तसेच दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढही मागितली नाही. हे कारण पुढे करत आरोपींच्या वकिलांनी तिघांना जामिन मंजूर करण्याबाबतचा अर्ज न्यायालयात केला होता. 

दरम्यान, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात या तिघांचा समावेश असल्याने त्यांना जामीन मिळूनही तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता नसल्याचे दिसत आहे.

Web Title: Dr Dabholkar murder case accused granted bail