जाती-धर्माचे बंधन तोडत वारकऱ्यांना मदतीचा हात देणारे डॉ. दानिश खान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जुलै 2019

- पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना मदतीचा हात देणारे संगमनेरचे डॉ. दानिश खान.

- दानिश खान यांची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा

पुणे : पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना मदतीचा हात देणारे संगमनेरचे डॉ. दानिश खान. दानिश खान यांची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. जाती-धर्माच्या पलीकडे माणुसकी जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीचे सगळीकडे कौतुक होत आहे.

दानिश खान हे संगमनेर नगरपरिषेदेचे अपक्ष नगरसेवकही आहेत. त्यांनी जाती-धर्माचा कोणताही भेदभाव न करता सेवा केली. त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. पैठणमधून सुमारे चाळीस वारकरी त्यांची दिंडी घेऊन गाडीतून शिर्डी, वणीची देवी असे दर्शन घेऊन देहू आणि आळंदी मार्गे पंढरपूरला निघाले होते. मात्र, त्यावेळी त्यांची गाडी रात्री उशिरा संगमनेर येथील जोर्वे नाका रस्त्याजवळ बंद पडली. या गाडीमध्ये काही महिलांचाही समावेश होता.

बंद पडलेली गाडीची दुरुस्ती करण्यासाठी वेळ जाणार असल्याचे दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. त्यामुळे गाडीतील वारकऱ्यांना मोठा प्रश्न पडला होता. गावासह माणसंही अनोळखी पावसाचे वातावरण अशावेळी राहायचे तरी कुठे असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र, काही अडचणी आल्यानंतर त्यांना डॉ. खान यांनी मदतीचा हात दिला. खान यांनी महिलांसाठी एका रुग्णालयात तर पुरुषांसाठी खान यांच्याच स्व.अय्युब खान हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करून दिली.

दरम्यान, खान यांच्या कार्याचे सगळीकडे त्यांचे कौतुक केले जात असून, याबाबतची पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Danish Khan Helping to Varkari