रिक्षावाल्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत मराठीचे मारेकरी - डॉ. कांबळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली - महाराष्ट्रामध्ये रिक्षावाल्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच मराठीच्या मारेकऱ्यांच्या रूपात पाहायला मिळतात. राज्यात हिंदी, संस्कृत विद्यापीठ असताना मराठी विद्यापीठ नसल्याची खंत जाणवते.

मराठी शाळाबंद करण्याचा सपाटा सुरू झाला असून, त्या ठिकाणी इंग्रजी शाळा सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये सर्वांत मोठी संख्या राजकीय नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे. मराठी भाषा आपल्या राज्यामध्ये आणि इतर राज्यांमध्येही टिकवण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नाहीत, असे मत ‘आम्ही मराठीचे मारेकरी’ या परिसंवादामध्ये डॉ. कमलाकर कांबळे यांनी व्यक्त केले.

९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशीच्या डॉ. आनंदीबाई जोशी सभामंडपात ‘आम्ही मराठीचे मारेकरी’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. आनंद मेणसे, डॉ. दीपक पावर, डॉ. कमलाकर कांबळे, कृष्णाजी कुलकर्णी, ॲड. शांताराम दातार, ज्ञानेश महाराव हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. दीपक पवार म्हणाले, की मराठी शाळांची हरलेली लढाई आम्ही लढतो आहोत, तर अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी सीमावर्तीयांच्या वेदना मांडल्या.

सुमारे २५ लाख मराठी माणसांची महाराष्ट्रामध्ये येण्याची इच्छा असताना त्यांना अन्यायाने कर्नाटकामध्ये ठेवण्यात आले आहे. सीमा भागात दरवर्षी नऊ साहित्य संमेलने होत असून कोणत्याही अनुदानाशिवाय येथील मंडळी लोकसहभागातून ही संमेलने आयोजित करून भाषासंस्कृतीबद्दल विचार करतात. सीमावर्तीयांच्या मराठीच्या संघर्षाला सलाम करावाच लागेल.

Web Title: Dr kamlakar kamble talked about marathi language