अमरावतीत डॉ. पाटील विक्रमी मतांनी विजयी 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

मुंबई - विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येकी दोन अशा चार जागांची मतमोजणी सुरू असून अमरावती पदवीधर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. तर इतर तीन ठिकांणी मतमोजणी सुरू असून, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आपापल्या जागा राखण्याची चिन्हे आहेत. 

अमरावती मतदारसंघात डॉ. पाटील यांनी 78 हजार 51 मते घेताना कॉंग्रेसचे संजय घोडके यांच्यावर विजय मिळवला. घोडके यांना 34 हजार 154 मते मिळाली. या निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर नाशिक-नगर पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे आघाडीवर आहेत; तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विक्रम काळे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा आघाडीवर आहेत, तर कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील यांनी आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे. या तीन जागांचे अधिकृत निकाला रात्री उशिरा हाती येणार आहेत. 

विधान परिषदेत निवडून द्यावयाच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर मतसंघातून दोन तर नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघातून दोन जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, बहुजन समाज पक्ष, लोकभारती, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले होते. यांच्यासोबत अन्य अपक्षांनीही निवडणुकीत उडी घेतल्याने निवडणूक चुरशीची ठरली. अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपने डॉ. रणजित पाटील, नाशिक मधून कॉंग्रेसने डॉ. सुधीर तांबे, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने विक्रम काळे यांना पुन्हा संधी दिली होती. कोकण शिक्षक मतदारसंघातून माजी आमदार रामनाथ मोते यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. आमदार कपिल पाटील यांनी लोकभारतीच्या तिकिटावर नागपूर येथून राजेंद्र झाडे आणि कोकण मतदारसंघातून अशोक बेलसरे यांना तिकीट दिले होते. या निवडणुकीसाठी 3 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते.

Web Title: DR. Patil won in amravati