तृप्ती देसाई म्हणाल्या, आता मी ३१ डिसेंबरला पुन्हा येईन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The dress code board in Shirdi will be removed on December 31

साई संस्थान सांगते, हा नियम केला आहे. परंतु हा फतवा आहे, असे फतवे तालिबानमध्ये केले जातात. त्यामुळे त्यांना आम्ही तालिबानी पुरस्कार देऊन तो बोर्ड ३१ डिसेंबरनंतर हटवू,

तृप्ती देसाई म्हणाल्या, आता मी ३१ डिसेंबरला पुन्हा येईन

नगर ः भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना शिर्डीत जाऊन आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी अडवले. त्यांना ताब्यात घेऊन पुण्याच्या हद्दीत सोडले. या प्रतिबंधात्मक कारवाईनंतर देसाई यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे.

शिर्डीतील साई संस्थानला त्यांनी बोर्ड हटविण्यासाठी ३१ डिसेंबरची डेटलाईन दिली आहे. त्या अगोदर हा बोर्ड काढला नाही तर तेथे जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा देसाई यांनी माध्यम प्रतिनिधींसमोर दिला आहे.

शिर्डी संस्थानने भाविकांना पारंपरिक ड्रेस कोडची अट घातली आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. तसेच शिर्डीत अर्धनग्न पुजारी कसे चालतात, असा उलट सवाल देसाईंनी विचारला होता. या प्रकरणामुळे राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटना आक्रमक झाल्या होत्या. ब्राह्मण महासंघाने देसाई यांना शेंदूर फासण्याचा इशारा दिला होता.

हेही वाचा - नगरमध्ये फुलली गांजाची शेती, तिघांनी केली लागवड

पोलिसांनी देसाई यांना शिर्डीत येण्यापूर्वी सुप्यात ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात नेवून बसवले. त्यानंतर त्यांना पुणे हद्दीत सोडले. त्यांना शिर्डीतील येण्यास मनाई होती.

देसाई यांना अटक केल्यानंतर शिर्डीत जल्लोष करण्यात आला. हा तालिबानी जल्लोष आहे. सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या बाबांच्या शिर्डीत अशी मानसिकता आहे, याचे वाईट वाटते. बोर्ड आम्ही हटवू म्हणून तो उंचावर नेला. परंतु तो फलक हटवला असता तर बरे झाले असते, असे देसाई यांनी स्पष्ट केलं.

साई संस्थान सांगते, हा नियम केला आहे. परंतु हा फतवा आहे, असे फतवे तालिबानमध्ये केले जातात. त्यामुळे त्यांना आम्ही तालिबानी पुरस्कार देऊन तो बोर्ड ३१ डिसेंबरनंतर हटवू, असा इशाराही देसाई यांनी दिला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top