esakal | ग्रामस्थांना मिळणार पीआर कार्ड, राज्यातील ७ तालुक्यांत ड्रोन सर्व्हे
sakal

बोलून बातमी शोधा

drone survey

ग्रामस्थांना मिळणार पीआर कार्ड, राज्यातील ७ तालुक्यांत ड्रोन सर्व्हे

sakal_logo
By
प्रशिक मकेश्वर.

तिवसा (जि. अमरावती) : अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाचा (drone technology) वापर करून गावांच्या गावठाणातील सर्व मिळकतधारकांचे मिळकतीचे मोजमाप करण्यात येणार आहे. नकाशा व त्याची मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी ग्रामविकास, महसूल व भूमीअभिलेख विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने स्वामित्व योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील सात तालुक्यांमध्ये तिवसा तालुक्याचा (teosa amravati) समावेश असल्याने येथे हालचालींनी वेग घेतला आहे. (drone survey in 7 taluka of maharashtra)

हेही वाचा: लेखी आश्वासनानंतरचं अविनाशवर अंत्यसंस्कार; रेस्क्यू टीम दाखल

अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व भूमीअभिलेख अधिकारी यांची कार्यशाळा फेब्रुवारीमध्ये अमरावती येथे राज्याच्या जमाबंदी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. त्यानंतर तिवसा तालुक्यामधील सर्व ग्रामसेवकांची कार्यशाळा पंचायत समितीत झाली. त्यानुसार सर्व ग्रामपंचायतींमधील नमुना आठ अद्ययावतीकरण करण्याची मोहीम राबवण्यात आली. सर्व माहिती भूमीअभिलेख कार्यालयात संकलित करण्यात आली. आता या माहितीच्या आधारे प्रत्यक्ष ड्रोन सर्वेक्षण होणार आहे. त्याबाबत जनजागृतीसाठी गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या आदेशाने सर्व ग्रामपंचायतमध्ये सभा घेण्यात आल्या. त्यात ग्रामस्थांना स्वामित्व योजनेद्वारे आपल्या मालमत्तेचे सनद पीआर कार्ड मिळणार आहेत. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन होऊन ग्रामपंचायतचे कर उत्पन्न वाढणार आहे. शासनाच्या खुल्या जागा, गावातील घरे, रस्ते, नाले यांचे सीमांकन होणार आहे. त्यामुळे गावठाणाचे अचूक नकाशे तयार होतील.

आगामी काळात होणाऱ्या ड्रोन सर्व्हेचे नियोजन अतिशय काटेकोरपणे करण्यात येत असून त्यासाठी तहसीलदार वैभव फरतारे, गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव व उपअधीक्षक भूमीअभिलेख चव्हाण सक्रिय झाले आहेत.

माहिती गोळा करणार -

सर्व्हे ऑफ इंडियाचे सहकार्य घेऊन एक पारदर्शक प्रकल्प राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे. खासगी संस्थेचे कर्मचारी ड्रोन सर्व्हे करण्यापूर्वी जाणार आहेत. हे कर्मचारी गावाची हद्द कायम करणे, सर्व्हेबाबत गावामध्ये प्रचार करणे, सर्व्हेच्या नोटीस पाठविणे, स्थानिक नागरिकांकडून माहिती गोळा करणे, याप्रकारची कामे करणार आहेत.

loading image