‘ड्रोन्स’ फुलवणार महाराष्ट्राची शेती

मंदार मुंडले
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पुणे - भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ‘ड्रोन्स’चा वापर लवकरच महाराष्ट्रातील शेतीत सुरू होणार आहे. पीकनिहाय पेरक्षेत्र मोजणी, अपेक्षित उत्पादनाचा अंदाज, गारपीट, पीक नुकसान क्षेत्र मोजणी, पिकांवरील रोगांचे पूर्वानुमान, त्याचे अचूक निदान व उपाय यासह विविध वृक्षांच्या बियांचे अचूक रोपण व त्याद्वारे वनवृद्धी आदी विविध कारणांसाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे. 

भारत सरकारच्या बंगळूर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स’ संस्थेच्या ‘एअरोस्पेस इंजिनियरिंग’ विभागाच्या मदतीने महाराष्ट्रात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस लवकरच सुरवात होणार आहे. 

असा होणार वापर 
     प्रत्येक हंगामात प्रत्येक पिकाचे पेरक्षेत्र मोजता येईल
     ‘नॅनो मिस्ट टेक्नॉलॉजी’चा वापर करून ड्रोनद्वारे कीडनाशकांची फवारणी
     रोगाचे पूर्वानुमान काढणार
     रोगाचे छायाचित्र काढून ‘क्लाउड’वर पाठवणे शक्य. 
     बियांचे रोपण ड्रोनद्वारे करून जंगलक्षेत्र वाढविणे शक्य  
     नुकसानाचा अंदाज काढणे शक्य 

Web Title: drone use in agriculture