
मुंबई - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून, यामध्ये आता संघटित गुन्हेगारीने अप्रत्यक्षपणे शिरकाव केला आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत आहेत. अमली पदार्थ पुरविण्यात नायजेरियन आणि इतर विदेशी नागरिकांचा सहभाग आहे. कुरिअर सेवेच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी होत असून, त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही, अशी कबुलीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत दिली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सुशिक्षित तरुणांमध्ये अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढल्यासंदर्भात चिंता व्यक्त करणारी लक्षवेधी सूचना काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केली होती. तरुणांना पार्ट्यांमध्ये खाद्यपदार्थ आणि पेयांमधून अमली पदार्थ टाकून त्यांना चटक लावली जात असल्याकडे गृह विभागाचे लक्ष वेधले. मात्र, अशा प्रकारच्या कुठल्याही गुन्ह्याची नोंद झाली नसल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या वेळी अनिल देशमुख म्हणाले की, कुरिअरद्वारे अमली पदार्थांची देवाणघेवाण आणि विक्री केली जात असून, नायजेरियन नागरिक यात मोठ्या प्रमाणात सामील आहेत. नायजेरियन लोक मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवसाय करीत असून, त्यांनी ठाण्यात नायजेरियन वाडी नामक वस्तीच उभारली आहे. गृह विभागाच्या वतीने अनेक नायजेरियन, अफगाणी नागरिकांना तुरुंगात टाकून त्यांच्यावरील खटला पूर्ण झाल्यावर त्यांना ‘डिपोर्ट’ करण्याची कार्यवाही केली जात असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.
२०१९ अमली पदार्थांचा विळखा
१४ हजार २९ एकूण गुन्हे दाखल
१४ हजार ८०५ आरोपींना अटक
१६ हजार ५२२ किलो अमली पदार्थ जप्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.