राज्य सरकारकडून मदतीतही दुजाभाव!

दीपा कदम
रविवार, 22 जुलै 2018

मुंबई - घरातून बाहेर पडल्यावर तुम्हाला कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागेल, हे सांगणे कठीण. चेंगराचेंगरीत गुदमरून काहींचा जीव जातो, नाहीतर कोसळलेल्या इमारतीबरोबर अनेकजण शेवटचा श्वास घेतात... अशा इतर कोणाच्या चुकीमुळे नाहक बळी जाणाऱ्यांची किंमत सरकारच्या लेखी असणार आहे केवळ निव्वळ चार लाख रुपये! दुसऱ्या बाजूला वाघ-रानडुकरांच्या हल्ल्यात बळी जाणाऱ्यांच्या नातेवाइकांना मिळणार दहा लाख रुपये! 

महसूल व वन विभागाने याबाबतचे दोन्ही आदेश नुकतेच दिले आहेत. दोन्ही आदेशांत बळी जाणाऱ्यांना मदत देण्याची किती आवश्‍यकता आहे, याविषयी संवेदना व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मृत्यू ओढावणाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करताना महसूल विभागाने दुजाभाव केला आहे.

सार्वजनिक आणि धार्मिक ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीत, जीर्ण झालेली इमारत खाली करण्याची स्थानिक प्राधिकरणाने रहिवाशांना नोटीस दिलेली नाही, अशा अधिकृत इमारत कोसळल्या, शेतामध्ये कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या विषबाधांच्या घटनेत बळी जाणाऱ्यांच्या नातेवाइकांना यापुढे केवळ चार लाखांची मदत मिळणार आहे. अशाप्रकारच्या घटनांमध्ये कोणताही अवयव निकामी होऊन अपंगत्व आल्यास ५० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे. २५ ते ३९ टक्के अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये, ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास एक लाख रुपये आणि ६० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक अपंगत्व असल्यास केवळ दोन लाख रुपयांची मदत मिळणार आहे. 

त्याउलट राज्यात वन्य जीवांच्या; म्हणजेच वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे यांच्या  हल्ल्यात बळी पडणाऱ्यांच्या नातेवाइकांना   दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वन्य जीवांच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या नुकसानभरपाईतही वाढ करण्यात आली असून, २५ हजारांवरून ही रक्कम आता ४० हजार रुपये एवढी करण्यात आली आहे.

Web Title: Duality from the state government for help