एकादशीमुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

पंढरपूर : निर्जला एकादशीनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी आज श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीमुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला. वारकऱ्यांना प्रदक्षिणा रस्त्यावरून चालणे मुश्‍कील झाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत होता. त्याच वेळी गावाबाहेर चार-चार वाहतूक पोलिस एकाच ठिकाणी उभारून वाहने अडवून दंडात्मक कारवाई करण्यात व्यस्त असल्याचे चित्र पाहण्यात आले. 

"निर्जला एकादशी'च्या दिवशी चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठलाच्या दर्शनाची पर्वणी साधण्यासाठी सुमारे एक लाख भाविक येथे आले होते. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग दर्शन मंडपातून पुढे सारडा भवनपर्यंत होती. गर्दीतदेखील अनेकजण वशिल्याने दर्शनाला जाण्यास मंदिर समिती कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. परगावाहून आलेल्या खाद्य विक्रेत्यांनी मंदिर परिसरातील रस्त्यांवर जागोजागी स्टॉल लावले आहेत. 

Web Title: Due to Ekadashi, crowd of devotees at Pandharpur