स्वातंत्र्य दिनी उघडणार शाळा? तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा होणार सुरू

स्वातंत्र्य दिनी उघडणार शाळा? तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा होणार सुरू
Summary

आता 15 ऑगस्टनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून ऑफलाइन वर्ग सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने सुरू केले आहे.

सोलापूर : कोरोनाची (Corona) पहिली लाट आणि दुसऱ्या लाटेमुळे तब्बल 15 महिन्यांपासून शाळांना कुलूपच आहे. शाळा (School) बंद असल्याने विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गोडी कमी होऊ लागली असून अनेकांकडे ऑनलाईनची (Online) साधनेही उपलब्ध नाहीत. या पार्श्‍वभूमीवर तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन 15 ऑगस्टपासून तीन टप्प्यात (three phases) ऑफलाइन शाळा (Offline school) सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केल्याचे विश्‍वसनिय सूत्रांनी सांगितले. (due to the rising corona the offline school will start in three phases from august 15)

स्वातंत्र्य दिनी उघडणार शाळा? तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा होणार सुरू
पंढरपूरच्या सोमनाथची इस्रोत भरारी

पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा मार्च 2020 पासून सुरूच झाली नाही. तर सहावी ते आठवीचे वर्ग मागच्या वर्षी काही दिवसांसाठीच सुरू झाले. त्यामुळे शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. शाळांमधील गर्दी पाहून मुले भेदरतील, वर्षभर मुले घरीच असल्याने त्यांच्यातील अभ्यासाची सवय मोडत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे अनेकांना डोळ्याचा त्रास सुरू झाल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

स्वातंत्र्य दिनी उघडणार शाळा? तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा होणार सुरू
'अँटीबॉडी कॉकटेल'नं कोरोनाचा खात्मा! बार्शीतील डॉक्टराने केला यशस्वी प्रयोग

ऑनलाइन शिक्षणापासून 26 टक्‍क्‍यांहून अधिक मुले वंचितच आहेत. या पार्श्‍वभूमीवर ऑफलाइन शाळा सुरू करण्याची गरज असल्याचे मत शिक्षणसंचालकांनी व्यक्‍त केले. त्याशिवाय शैक्षणिक गुणवत्ता टिकणार तथा वाढणार नाही, असेही तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता 15 ऑगस्टनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून ऑफलाइन वर्ग सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने सुरू केले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी तर दुसऱ्या टप्प्यात सहावी ते आठवी आणि तिसऱ्या टप्प्यात लहान मुलांचे वर्ग सुरू होतील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

स्वातंत्र्य दिनी उघडणार शाळा? तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा होणार सुरू
ऑनलाइन शाळा सुरु होणार, शिक्षक भरती कधी?

ऑनलाइन शाळा मंगळवार पासून (ता. 15) सुरू झाल्या असून काही महिन्यांत स्थानिक परिस्थिती पाहून ऑफलाइन शाळा सुरू करण्याचे नियोजन शासनस्तरावर आहे. दरम्यान, दहावी व बारावीच्या वर्गातील सर्वच शिक्षकांची शाळांमध्ये उपस्थिती बंधनकारक असून पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना 50 टक्‍क्‍यांच्या प्रमाणात उपस्थिती बंधनकारक असेल.

- डॉ. दत्तात्रय जगताप, शिक्षण संचालक, पुणे

स्वातंत्र्य दिनी उघडणार शाळा? तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा होणार सुरू
राज्यात १५ जूनपासूनच शाळा होणार सुरु

ठळक बाबी...

- पहिली ते बारावीच्या एक लाख 13 हजार शाळांमधील दोन कोटींहून अधिक मुलांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे अशक्‍य

- नववी ते बारावी, सहावी ते आठवी आणि पहिली ते पाचवी, अशा टप्प्यांत सुरू होणार ऑफलाइन शाळा

- कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक व नागपूर या विभागांमधील पाच टप्प्यांमधील कोरोनाची स्थिती पाहून जिल्हाधिकारी घेणार निर्णय

- सध्या दहावी व बारावीच्या वर्गांवरील 100 टक्‍के शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थिती बंधनकारक

- पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना 50 टक्‍क्‍यांच्या प्रमाणात शाळेत हजर राहण्याचे बंधन

(due to the rising corona the offline school will start in three phases from august 15)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com