esakal | 'अँटीबॉडी कॉकटेल'नं कोरोनाचा खात्मा! बार्शीतील डॉक्टराने केला यशस्वी प्रयोग
sakal

बोलून बातमी शोधा

'अँटीबॉडी कॉकटेल'नं कोरोनाचा खात्मा! बार्शीतील डॉक्टराने केला यशस्वी प्रयोग

सोलापुरातल्या बार्शीतील डॉ.संजय अंधारे यांनी 4 कोरोनाबाधितांना 'अँटीबॉडी कॉकटेल'च्या डोसने बरं केलं आहे.

'अँटीबॉडी कॉकटेल'नं कोरोनाचा खात्मा! बार्शीतील डॉक्टराने केला यशस्वी प्रयोग

sakal_logo
By
विश्वभूषण लिमये

सोलापूर : महाराष्ट्रात कोरोना (Corona) नियंत्रणात येत असल्याच चित्र असलं तरी तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच आता कोरोनाच्या गंभीर रुग्णांना बरी करणारी उपचार पद्धती समोर आली आहे. 'अँटीबॉडी कॉकटेल' (antibody cocktail) पद्धत महाराष्ट्रात यशस्वी झाली आहे. ही उपचार पद्धत नेमकी कशी आहे? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. (Dr. Sanjay Andhare from Barshi has cured Corona patients with a dose of antibody cocktail)

हेही वाचा: अक्कलकोट-सोलापूर महामार्ग पाच महिन्यात होणार पूर्ण, लवकरच टोलही सुरू

सोलापुरातील बार्शीमध्ये 'अँटीबॉडी कॉकटेल'चा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. यामुळे कोरोनाचे गंभीर रुग्ण तात्कळ बरे झाल्याचं पहायला मिळालं आहे. 'मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल' कोरोनावरील या उपचार पद्धतीकडे आता रामबाण उपाय म्हणून पाहिलं जात आहे. हैद्राबादच्या 'एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोऍड्रोलॉजी' या संस्थेने 40 हून अधिक कोरोना बाधितांवर 'अँटीबॉडी कॉकटेल'चा प्रयोग यशस्वी केला आणि पहिल्याच दिवशी बाधितांमधील लक्षण गायब झाली. आणि आता सोलापुरात ही हा प्रयोग यशस्वी झाला आहे. सोलापुरातील 4 रुग्ण या उपचार पद्धतीमुळे बरे झाले आहेत.

हेही वाचा: दिलासादायक! सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख रुग्णांनी कोरोनाला हरविले

विशेष म्हणजे आता महाराष्ट्रात ही 'अँटीबॉडी कॉकटेल'चा प्रयोग यशस्वी झाला आहे. सोलापुरातल्या बार्शीतील डॉ.संजय अंधारे यांनी 4 कोरोनाबाधितांना 'अँटीबॉडी कॉकटेल'च्या डोसने बरं केलं आहे. विशेष म्हणजे 60 वर्षावरील रक्तदाब, मधुमेह आणि दमा असलेले रुग्ण अँटीबॉडी कॉकटेलमुळे बरे झाले आहेत. सध्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे, त्यात 'अँटीबॉडी कॉकटेल' उपचार पद्धती प्रभावी ठरत असल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: पुणे-सोलापूर मार्गाने प्रवास करताय? वाचा महत्त्वाची बातमी

ठळक...

- कोरोनाची लागणं झाल्यावर 3 ते 7 दिवसाच्या आत अँटीबॉडी कॉकटेलचा डोस दिला जातो

- कॉकटेलमध्ये कासिरिव्हीमॅब आणि इंडेव्हिमॅब या दोन औषधांचा समावेश आहे.

- भारतामध्ये या दोन औषधांची किंमत जवळपास 70 हजाराहून जास्त आहे

- या डोसनंतर कोरोनाबाधितांचा ताप, खोकला, अस्वस्थपणा यासारखी लक्षण 100 टक्के गायब झाली आहेत.

- ब्रिटन,ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत ही उपचार पद्धत प्रभावी ठरलीय.

हेही वाचा: सोलापूर विद्यापीठाची जुलै व ऑगस्टमधील परीक्षाही ऑनलाइनच !

यावेळी डॉ.संजय अंधारे म्हणाले, या चार रुग्णांमध्ये कारमाळ्यातील एका डॉक्टरांच्या 65 वर्षीय आईचा आणि बार्शीतल्या एका वकिलाच्या वडिलांचा समावेश होता. 'अँटीबॉडी कॉकटेल'च्या डोस नंतर त्यांना दुसऱ्या दिवशी घरी पाठवण्यात आले. (Dr. Sanjay Andhare from Barshi has cured Corona patients with a dose of antibody cocktail)

loading image